वंचित आघाडीला मुस्लीम मते कमी प्रमाणात मिळाली - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 02:56 AM2019-06-05T02:56:04+5:302019-06-05T02:56:17+5:30

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू

The deprived alliance got lesser Muslim votes - Prakash Ambedkar | वंचित आघाडीला मुस्लीम मते कमी प्रमाणात मिळाली - प्रकाश आंबेडकर

वंचित आघाडीला मुस्लीम मते कमी प्रमाणात मिळाली - प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळे या आघाडीची ताकद सर्वांनाच दिसली आहे. मात्र औरंगाबाद वगळता इतरत्र मुस्लीम समाजाची मते कमी प्रमाणात मिळाली, असे आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की काँग्रेस आघाडीसोबत जाणार, यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. पुढील रणनीती आणि भूमिका यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमसंदर्भात संशयाचे धुके कायमच असून, त्या विरोधात आता लढा देण्याचे ठरविले आहे. इतर पक्षांनी त्याचे समर्थन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आघाडी व युतीच्या राजकारणात संघटनेची माती होते. जागा वाटपाच्या मुद्दामुळे अनेक कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही. त्याचा परिणाम संघटनेवर होतो. काँग्रेस त्याचे उत्तम उदाहरण आहे. जागा वाटपाच्या याच गुंत्यामुळे काँग्रेस पक्षाची स्थिती आता केवळ ‘एनजीओ’ सारखीच राहील, असे आंबेडकर म्हणाले.

राजू शेट्टींचे स्वागत आहे
राजू शेट्टींना वंचित सोबत येण्याचे निमंत्रण आम्ही दिले होते; परंतु ते काँग्रेस आघाडीसोबत गेले.आता विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

...तर राज ठाकरेंना सुवर्णसंधी
विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

Web Title: The deprived alliance got lesser Muslim votes - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.