मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रस्ता ओलांडताना दुर्मिळ सांबर जातीचा हरीण मृत्युमुखी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 07:01 PM2017-12-10T19:01:06+5:302017-12-10T19:01:25+5:30

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी दुर्मिळ सांबर प्रजातीच्या हरिणाचे रस्ता ओलांडताना मृत्यू झाले. द्रुतगती महामार्गावरील पुणे कडे जाणा-या लेनला पहाटे ६ वाजता हा अपघात झाला . 

Deer killed a rare Sambar race while crossing the road on the Mumbai-Pune Express Highway | मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रस्ता ओलांडताना दुर्मिळ सांबर जातीचा हरीण मृत्युमुखी 

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रस्ता ओलांडताना दुर्मिळ सांबर जातीचा हरीण मृत्युमुखी 

Next

पनवेल : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी दुर्मिळ सांबर प्रजातीच्या हरिणाचे रस्ता ओलांडताना मृत्यू झाले. द्रुतगती महामार्गावरील पुणे कडे जाणा-या लेनला पहाटे ६ वाजता हा अपघात झाला . 
खालापूर येथील दस्तुरी हॉटेल जवळ हा अपघात झाला . घटनेची माहिती मिळताच खालापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत . या अपघाताची माहिती घेतली . विशेष म्हणजे हा सांबर प्रजातीचा हरीण अतिशय दुर्मिळ असल्याची माहिती पाटील यांनी दिली . हा प्राणी याठिकाणी स्थलांतरित झाला असल्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला . याठिकाणी असलेल्या वन्यजीवांना याठिकाणच्या रस्त्याची परिपूर्ण माहिती असल्याने अशा प्रकारे प्राण्याचे अपघात होत नसतात . मात्र हा प्राणी स्थलांतरित असल्याने याठिकाणच्या रस्त्याची माहिती नसल्याने हा अपघात झाला .

Web Title: Deer killed a rare Sambar race while crossing the road on the Mumbai-Pune Express Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.