Ayodhya Result : अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, दोन दिवसांत शिवनेरीवर जाईन - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 04:15 PM2019-11-09T16:15:18+5:302019-11-09T16:20:39+5:30

Ayodhya Verdict : आज निकालानंतर सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

A day to be written in golden letters - Uddhav Thackeray on Ram mandir Verdict | Ayodhya Result : अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, दोन दिवसांत शिवनेरीवर जाईन - उद्धव ठाकरे

Ayodhya Result : अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, दोन दिवसांत शिवनेरीवर जाईन - उद्धव ठाकरे

Next

मुंबई : अयोध्येतील रामजन्मभुमीच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि वाद संपवला. अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


आज निकालानंतर सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांची आठवण येणे स्वाभाविक आहे. राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. लवकरच अडवाणींची भेट घेणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. 


तसेच त्यांनी गेल्या वर्षी अयोध्येला गेल्याची आठवणही करून दिली. 24 नोव्हेंबरला शिवनेरीची माती अयोध्येमध्ये ठेवली आणि वर्षाच्या आत निकाल लागला. सर्व सुरळीत राहिले तर मी पुन्हा 24 तारखेला अयोध्येला जाईन. येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा शिवनेरीवर जाणार आहे. एक अध्याय संपला असला तरीही पर्व सुरू होत आहे. आनंद साजरा करा पण कोणाच्या भावना दुखावू नका असे आवाहनही त्यांनी केले. 

 

Web Title: A day to be written in golden letters - Uddhav Thackeray on Ram mandir Verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.