काँग्रेस आता राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर गल्लीबोळातला झालाय- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 04:42 PM2019-02-04T16:42:09+5:302019-02-04T16:44:47+5:30

भारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Congress is no strength in maharashtra - Prakash Ambedkar | काँग्रेस आता राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर गल्लीबोळातला झालाय- प्रकाश आंबेडकर

काँग्रेस आता राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर गल्लीबोळातला झालाय- प्रकाश आंबेडकर

Next
ठळक मुद्देभारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊ, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नाही. काँग्रेसकडे चांगला चेहराच नाही.

लातूर- भारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊ, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नाही. काँग्रेसकडे चांगला चेहराच नाही.

मुंबई, ठाणे आणि पुण्यात काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही नाहीत. काँग्रेस भाजपा आणि आरएसएसला मागे टाकू शकत नाही. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. रॉबर्ट वड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत. अशोक चव्हाणही त्याच प्रकारातील नेते आहेत. काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही. कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायचं हे अजून नक्की झालेलं नाही.

आम्ही काँग्रेसकडे जागा मागितलेल्या नाहीत. काँग्रेसकडे लातूरमध्ये उमेदवार नाहीत. नाहीतरी त्या पडणार आहेत. पंतप्रधान तुमचा, मंत्रिमंडळ तुमचं फक्त आम्ही कॅबिनेटच्या काँग्रेसमध्ये अनेक आरएसएस स्लीपर सेल्स आहेत. संविधानामुळे मुस्लिस, व्हीजेएनटीला न्याय मिळालेला आहे. भटक्या विमुक्त, मुस्लिमांना काँग्रेस सोबत घेऊ इच्छित आहे. 

Web Title: Congress is no strength in maharashtra - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.