सांख्यांसी प्रकृती आदिमायाशक्ती

By admin | Published: September 28, 2014 03:21 AM2014-09-28T03:21:11+5:302014-09-28T03:21:11+5:30

विश्‍वाची निर्मिती ज्या आदिशक्तीने केली, ती देवता म्हणजे अंबाबाई. शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसर्‍या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची आदिमायेच्या रूपात पूजा बांधण्यात आली.

Coincidence | सांख्यांसी प्रकृती आदिमायाशक्ती

सांख्यांसी प्रकृती आदिमायाशक्ती

Next

 कोल्हापूर : विश्‍वाची निर्मिती ज्या आदिशक्तीने केली, ती देवता म्हणजे अंबाबाई. शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसर्‍या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची आदिमायेच्या रूपात पूजा बांधण्यात आली. एकनाथांचे नातू मुक्तेश्‍वर यांच्या शब्दांत ‘सांख्यांसी प्रकृती’ अशी ही जगदंबा आदिमायाशक्ती असे देवीचे वर्णन आहे. 

  • शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसर्‍या दिवशी दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची आदिमाया रूपात पूजा बांधण्यात आली. विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण अवतार म्हणजे श्री कपिलमुनी. स्वयंभू व मनूची कन्या देवहुती हिचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. अनसूया आदी कन्यांच्या जन्मानंतर त्यांना कपिल नामक पुत्र झाला. समस्त विश्‍वप्रकृती पुरुष यांच्या आश्रयाने प्रकट झाले असून त्यावर कालाची सत्ता चालते. हे सांख्य तत्त्वज्ञान शिकविणारे कपिल मुनी यांचे स्थान म्हणजे कपिलेश्‍वर. त्यांची माता देवहुती हिची ज्ञानलालसा जाणून स्वत:च्या मातेचे गुरुपद त्यांनी घेतले. हे जगावेगळे नाते केवळ याच करवीरात आकाराला आले. अशा या देवहुती मातेला सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचे मूर्त स्वरूप म्हणून आजही श्री अंबाबाईच्या मस्तकी नाग (काल), लिंग (पुरुष), योनी (प्रकृती) आपल्याला पाहायला मिळते. 
    ही पूजा श्रीपूजक सागर मुनीश्‍वर, रवी माईनकर यांनी बांधली. पूजेची संकल्पना उमाकांत राणिंगा यांची असून, मूर्ती सज्रेराव निगवेकर व प्रशांत इंचनाळकर यांनी साकारल्या आहेत. आज दिवसभरात विठूमाउली भजनी मंडळ, साईप्रसाद भजनी मंडळ (पुणे), दत्तकृपा भजनी मंडळ (पुणे), स्त्रीशक्ती जागर, इंद्राणी ग्रुप (पुणे), भक्तिगीतांवर नृत्य - श्रावण सखी ग्रुप (डोंबिवली), श्री अंबाबाईचा जागर या संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 
    शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसर्‍या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची आदिमाया रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा सागर मुनीश्‍वर व रवी माईनकर यांनी बांधली (छाया : आदित्य वेल्हाळ) 

Web Title: Coincidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.