सिंगापूरच्या उद्योगांना गुंतवणुकीची हाक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्योगपतींशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:39 AM2017-09-29T01:39:02+5:302017-09-29T01:39:19+5:30

दक्षिण कोरियाच्या दौ-यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी सिंगापूरच्या भेटीवर आगमन झाले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण असून अनेक सोईसुविधा आपल्या शासनाने दिलेल्या आहेत.

Chief Minister Devendra Fadnavis talked to investment industry in Singapore, with businessmen | सिंगापूरच्या उद्योगांना गुंतवणुकीची हाक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्योगपतींशी चर्चा

सिंगापूरच्या उद्योगांना गुंतवणुकीची हाक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्योगपतींशी चर्चा

Next

मुंबई : दक्षिण कोरियाच्या दौ-यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी सिंगापूरच्या भेटीवर आगमन झाले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण असून अनेक सोईसुविधा आपल्या शासनाने दिलेल्या आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी तेथील उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन केले.
सिंगापूर येथील इन्स्टिट्यूट आॅफ साऊथ एशिया स्टडिज (आयएसएएस), नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ सिंगापूर (एनयुएस) आणि सीआयआय यांच्यावतीने आयोजित व्याख्यानात मुख्यमंत्री बोलत होते. इन्स्टिट्यूट आॅफ साऊथ एशिया स्टडिजचे अध्यक्ष आणि राजदूत गोपीनाथ पिल्लई यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसमावेशक विकासाकडे राज्याची दमदार वाटचाल सुरू असून त्यासाठी ‘सब का साथ, सब का विकास’ हे सूत्र आम्ही स्वीकारले आहे. ‘ईज आॅफ डुईंग बिझनेस’च्या माध्यमातून राज्य सरकारने उद्योग क्षेत्रात सुधारणांची मोठी प्रक्रिया हाती घेतली आहे.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis talked to investment industry in Singapore, with businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.