Chandrakant Patil : केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय, चंद्रकात पाटलांचा सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 12:33 PM2021-04-08T12:33:36+5:302021-04-08T12:44:18+5:30

Chandrakant Patil : आठवीतल्या विद्यार्थ्यांनाही कळतं, अनिल परब यांची गृह खात्यात लुडबूड होतेय, याबद्दल शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांनी विधानसभेतही वाझेंप्रकरणात विशेष लक्ष घातलं होतं

Chandrakant Patil : Union Health Minister slammed Chandrakant Patil's government on vaccination | Chandrakant Patil : केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय, चंद्रकात पाटलांचा सरकारला टोला

Chandrakant Patil : केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय, चंद्रकात पाटलांचा सरकारला टोला

Next
ठळक मुद्देलसीकरणाच्या मुद्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला ठोक ठोक ठोकलंय, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यानी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केलीय.

मुंबई - राज्यात पुढील 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. तसेच, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला फटका बसल्याचं सांगत ठाकरे सरकावर जोरदार टीका केली. डॉ. हर्षवर्धन यांच्या टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. 

आठवीतल्या विद्यार्थ्यांनाही कळतं, अनिल परब यांची गृह खात्यात लुडबूड होतेय, याबद्दल शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांनी विधानसभेतही वाझेंप्रकरणात विशेष लक्ष घातलं होतं. यावरुन, कुणालाही लक्षात येतं. सध्याच्या परिस्थितीवरुन सर्वसामान्य माणसांना वीट आलाय, असेही चंद्रकात पाटील यांनी म्हटले. राज्य सरकारकडून ही संघटीत गुन्हेगारी होत आहे. सर्वसामान्य माणसांना जो न्याय आहे, तोच इथे लागावा. याप्रकरणी मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केलीय. 

लसीकरणाच्या मुद्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला ठोक ठोक ठोकलंय, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यानी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केलीय. महाराष्ट्रात इंजेक्शनचा पत्ता नाही, लसीकरणासाठी तुमचा योग्य कारभार नाही. प्रत्येक विषयात जर तुम्ही केंद्राला दोष देणार असाल तर केंद्राकडे राज्य चालवायला द्या, असेही पाटील म्हणाले. 

डॉ. हर्षवर्धन यांच्यावर काँग्रेसचा पलटवार

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसनं पलटवार केला. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘शेवटी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तथा मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच! अपेक्षेप्रमाणे आणि आजवरच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांनी आपल्या नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्यांच्या खासकरुन बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायला सुरवात केली आहे’, असा पलटवार महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. (Allegations between the Center and the Maharashtra government over the shortage of corona vaccine)

डॉ. हर्षवर्धन यांनी शेअर केलं परिपत्रक

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याचं म्हटलंय. त्यावर एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केलीय. महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक परिपत्रकच शेअर केलंय. 
 

Web Title: Chandrakant Patil : Union Health Minister slammed Chandrakant Patil's government on vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.