स्मृती इराणी यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी पुण्यात खटला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:24 PM2019-04-16T15:24:59+5:302019-04-16T20:31:59+5:30

स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती दिली असल्याचा ठपका ठेवला आहे.

case of fraud registred against Smriti Irani in Pune | स्मृती इराणी यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी पुण्यात खटला दाखल

स्मृती इराणी यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी पुण्यात खटला दाखल

Next

पुणे : अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवित असलेल्या भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. प्रथम न्यायदंडाधिकारी बी.एस गायकवाड यांच्या कोर्टात मंगळवारी खटला दाखल करण्यात आला आहे.मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी अ‍ॅड़. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत मंगळवारी खटला दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी़. एस़. गायकवाड यांच्या न्यायालयात हा फौजदारी खटला दाखल केला असून त्यावर लवकर न्यायालयात आदेश देण्याची शक्यता आहे़. 

 भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी यंदा निवडणूक लढविताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेविषयी खोटी माहिती दिली आहे. यापूर्वीच्या 2014 निवडणूकीत देखील त्यांनी चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल केली होती. याप्रकरणी बी. एस.गायकवाड यांच्या कोर्टात इराणी यांच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला आहे. 
 इराणी या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. इराणी यांनी 2004 साली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या विरोधात दिल्लीतील चांदणी चौक मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. अ‍ॅड. रुपाली पाटील यांनी इराणी यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.  फिर्यादीकडून अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील हे काम पाहत आहेत. याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले, गेल्या काही दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी माहिती लपविल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे समजले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर त्यांनी निवडणूकीमध्ये फायदा मिळविण्याच्या उद्देशाने 2004 मध्ये बी ए ची पदवी 1996 मध्ये पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले.  फिर्यादी यांनी संकेतस्थळावर इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यावर इराणी यांनी बीए पूर्ण केले नसल्याचे दिसून आले. याबरोबरच पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास आले. या फसवणूकीची लेखी तक्रार देऊन देखील   खडक पोलीस स्टेशन याठिकाणी फिर्यादी यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे अर्जात नमुद करण्यात आले आहे.  
दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती देत स्मृती इराणी यांनी मतदार यांची फसवणूक केली आहे. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण खडक पोलीस स्टेशन यांच्याकडे तपासाकरिता पाठविण्यात यावे, तसेच हा खटला गुणदोषावर चालवून आरोपीला कडक शासन करण्यात यावे. असा विनंती अर्ज कोर्टाला सादर करण्यात आल्याचे अ‍ॅड. ठोंबरे पाटील यांनी सांगितले. 

Web Title: case of fraud registred against Smriti Irani in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.