कारंजा चक्रीघाटात अपघात, एक महिला ठार तर तीन जखमी

By admin | Published: July 23, 2016 09:37 PM2016-07-23T21:37:30+5:302016-07-23T21:37:30+5:30

अमरावती - नागपूर महामार्ग क्रमांक ६ वर नागपूरहुन अमरावतीकडे जाणा-या अपघातात एक महिला ठार झाली तर अन्य तीन जखमी झाले

Carranza accidentally injured, while one woman killed and three injured | कारंजा चक्रीघाटात अपघात, एक महिला ठार तर तीन जखमी

कारंजा चक्रीघाटात अपघात, एक महिला ठार तर तीन जखमी

Next
>ऑनलाइन लोकमत -
वर्धा, दि. 23 - अमरावती - नागपूर महामार्ग क्रमांक ६ वर नागपूरहुन अमरावतीकडे जाणा-या मारुती स्विफ्ट क्रमांक एमएच ३४ एए ३३०१ चा अपघात झाला. यात एक महिला ठार झाली तर अन्य तीन जखमी झाले. जखमींना प्रथम ग्रामिण रुग्णालय कारंजा व लगेच नागपूर येथे पुढील उपचाराकरीता हलविण्यात आले. सदर घटना शनिवारी सांयकाळी ७ वाजण्याचा दरम्यान घडली.
 
चंद्रपूर येथील मदनशेट्टीवार परिवार आपल्या कारने अमरावती येथे जात असतांना मागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चालक सारंग मुरलीधर मामेडवार यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार रस्ता दुभाजकावर चढली. यात साधना अनिल मदनशेट्टीवार वय ४७, ही महिला ठार झाली तर जखमी मध्ये धनश्री अनिल मदनशेट्टीवार वय २३, व अनिल मदनशेट्टीवार वय ५५ हे जखमी झाले. याबाबत कारंजा पोलिसांचा तपास सुरु असुन घटनेची पोलिसात नोंद व्हायची आहे.
 

Web Title: Carranza accidentally injured, while one woman killed and three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.