एटीएम फोडले.. पण हाती प्लॅस्टिक लागले !

By admin | Published: May 3, 2016 06:18 PM2016-05-03T18:18:20+5:302016-05-03T18:18:20+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड गावी मंगळवारी पहाटे सेंट्रल बँकेचे एटीएम सेंटर फोडण्यात आले.

Broke the ATM. But it was plastic! | एटीएम फोडले.. पण हाती प्लॅस्टिक लागले !

एटीएम फोडले.. पण हाती प्लॅस्टिक लागले !

Next

 ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. 3-  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड गावी मंगळवारी पहाटे सेंट्रल बँकेचे एटीएम सेंटर फोडण्यात आले. 
वरचे कव्हर पूर्णपणे उचकटण्यात चोरट्यांना यश आले असले तरी मशीनचा मुख्य दरवाजा मात्र त्यांना तोडता आला नाही, त्यामुळे आतील रोख रककम शाबूतच राहिली. दरम्यान, तोंडाला कापड बांधलेल्या दोघांची दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. 
चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर हे सेंटर तत्काळ सील करण्यात आले. दुपारनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे, हेच एटीएम सेंटर दाेन वर्षांपूर्वीही फोडून तब्बल सात लाख रूपये चोरले गेले होते. त्यातील आरोपींना नंतर अटकही झाली होती.

Web Title: Broke the ATM. But it was plastic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.