विधानसभाही प्रचंड बहुमताने जिंकण्याची भाजपची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:49 AM2019-06-07T03:49:33+5:302019-06-07T03:50:05+5:30

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड मध्ये यावर्षी होणाऱ्या निवडणुका पाहता हे धोरण, रणनीति अवलंबिली जाईल

BJP's plan to win Vidhan Sabha by a huge margin | विधानसभाही प्रचंड बहुमताने जिंकण्याची भाजपची योजना

विधानसभाही प्रचंड बहुमताने जिंकण्याची भाजपची योजना

Next

नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमधील यशानंतर भाजपने पुन्हा एकदा पक्ष भक्कम करण्यासाठी नवी रणनीती तयार केली. दलित आणि मागास मतदारांना पक्षासोबत जोडण्यासाठी एक हजार दलितांशी संपर्क साधण्यास नेते मंडळींना सांगितले जाईल. यासाठी बुद्धीजीविंचे पॅनेल बनविले जाईल.

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड मध्ये यावर्षी होणाऱ्या निवडणुका पाहता हे धोरण, रणनीति अवलंबिली जाईल, असे मानले जाते. भाजपचे लक्ष प्रत्येक वर्गातील मतदात्यांवर आहे. योजनेनुसार भाजप नवे दलित चेहरे तयार करेल. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांपासून वंचित लोकांपर्यंत लाभ पोहचविला जाईल. योजनांपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेल्यांपर्यंत त्या पोहचविल्या जातील. दलित आणि मागास वर्गातील मतदारांपर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्यासोबतच सातत्यपूर्ण संपर्क साधूनच त्यांच्यापर्यंत पोहचता येईल. विश्वास संपादन करता येईल, असे पक्षाला वाटते. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘सबका विश्वास’ धोरणानुसार, त्यांना पक्षाचे खात्रीशीर मतदार बनविता येईल, असे पक्षाचे मत आहे.

Web Title: BJP's plan to win Vidhan Sabha by a huge margin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.