जे.जे.मध्ये ‘चौळ्यां’ना जन्म, माता व बालके सुखरूप : महिनाभराच्या उपचारानंतर डिस्चार्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 04:43 AM2017-09-12T04:43:46+5:302017-09-12T04:44:26+5:30

जे. जे. रुग्णालयात जहानरा शेख या २९ वर्षाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर त्यांची काळजी घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

Birth of 'chowlyan' in JJ, mother and child safely: Discharge after treatment for one month | जे.जे.मध्ये ‘चौळ्यां’ना जन्म, माता व बालके सुखरूप : महिनाभराच्या उपचारानंतर डिस्चार्ज  

जे.जे.मध्ये ‘चौळ्यां’ना जन्म, माता व बालके सुखरूप : महिनाभराच्या उपचारानंतर डिस्चार्ज  

Next

मुंबई : जे. जे. रुग्णालयात जहानरा शेख या २९ वर्षाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर त्यांची काळजी घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. एकाचवेळी चार मुलांना जन्म देण्याची मुंबईतील गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जहानरा हिने सात आॅगस्टला तिने एक मुलगा व तीन मुलींना जन्म दिला. जहानरा नाशिकची असून गेल्या पाच महिन्यांपासून उपचारासाठी जे. जे. मध्ये येत होती. डॉ. प्रीती लेव्हीस, डॉ. निधी व डॉ. शर्वरी यांच्याकडून तिच्यावर उपचार सुरू होते.

जन्मावेळी मुलाचे वजन
1.85 KG
तीन मुलींचे
वजन अनुक्रमे
950gm
1.2 KG
1.4 KG
रविवारी घरी सोडताना या ‘चौळ्यां’चे वजन अनुक्रमे
2.0 KG
1.9 KG
1.8 KG
1.8 KG

Web Title: Birth of 'chowlyan' in JJ, mother and child safely: Discharge after treatment for one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.