भुजबळांना डेंग्यू नाही,व्हायरल फिवर- डॉ. तात्याराव लहाने

By admin | Published: September 18, 2016 05:41 PM2016-09-18T17:41:38+5:302016-09-18T17:41:38+5:30

ऑर्थर रोड जेलमध्ये अटकेत असणारे आणि सध्या मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेग्यू झाला नसल्याचं स्पष्ट

Bhujbal gets dengue, viral fever - Dr. Tatarrao Lahane | भुजबळांना डेंग्यू नाही,व्हायरल फिवर- डॉ. तात्याराव लहाने

भुजबळांना डेंग्यू नाही,व्हायरल फिवर- डॉ. तात्याराव लहाने

Next

पुजा दामले/ ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि.18- ऑर्थर रोड जेलमध्ये अटकेत असणारे आणि सध्या मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेग्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भुजबळ यांना डेंग्यू नाही, व्हायरल फिवर आहे तसंच त्यांना  हृदय विकाराचाही त्रास होत आहे, त्यांच्या तपासण्या सुरू असून अजूनही एमआयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे  जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता  डॉ. तात्याराव लहाने  यांनी सांगितले.

काल प्रकृती बिघडल्यानंतर भुजबळांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं.भुजबळ यांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्याचबरोबर त्यांना तापही होता. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्लेटलेट्स काही प्रमाणात कमी झाल्या होत्या, सध्या भुजबळांवर मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट (एमआयसीयू) मध्ये उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटत होते. प्रकृती बिघडल्यानंतर जेजे रूग्णालयातील डॉक्टारांच्या एका पथकाने त्यांची तुरूंगात जाऊन तपासणी केली. त्यानंतर त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आलं .
 
 

Web Title: Bhujbal gets dengue, viral fever - Dr. Tatarrao Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.