‘ती’ वागणूक म्हणजे छळच ! ‘व्हायरल’चा नाद : बालपणीच्या आठवणीचे भविष्यात दिसतात गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 07:19 AM2017-08-21T07:19:08+5:302017-08-21T07:19:08+5:30

दोन दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने, लहानग्या चिमुरडीचा अभ्यास शिकतानाचा व्हिडीओ शेअर केला. अवघ्या काही वेळातच या व्हिडीओविषयी समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या.

 'That' behavior is torture! The sounds of 'viral': Childhood memories appear in the future, with serious consequences | ‘ती’ वागणूक म्हणजे छळच ! ‘व्हायरल’चा नाद : बालपणीच्या आठवणीचे भविष्यात दिसतात गंभीर परिणाम

‘ती’ वागणूक म्हणजे छळच ! ‘व्हायरल’चा नाद : बालपणीच्या आठवणीचे भविष्यात दिसतात गंभीर परिणाम

Next

- स्नेहा मोरे  
मुंबई : दोन दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने, लहानग्या चिमुरडीचा अभ्यास शिकतानाचा व्हिडीओ शेअर केला. अवघ्या काही वेळातच या व्हिडीओविषयी समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. व्हिडीओमध्ये चिमुरडी हात जोडून आपल्या आईला अभ्यास प्रेमाने शिकविण्याची विनवणी करताना दिसते आहे. या व्हिडीओमधील पालकांचे वागणे म्हणजे लहानग्यांचा ‘छळ’ असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले आहे.
या व्हिडीओत अवघ्या तीन-चार वर्षांची चिमुरडी ‘वन..टू..थ्री..फोर’ वाचायला शिकते आहे. मात्र, त्या चिमुरडीला ते नीटसे जमत नसल्याने, व्हिडीओ शूटींग करणारी तिची आई जोरात ओरडतेय, शिवाय मारताना दिसते आहे. ती चिमुरडी अतिशय केविलवाणी होऊन ‘प्यार से पढाइये’ असेही म्हणतेय. चिमुरडी खूप घाबरलेली दिसते आहे, हे प्रकार केवळ ‘व्ह्यूज’ आणि ‘व्हायरल’ होऊन चर्चेत येण्यासाठी केले जात आहेत. हा व्हिडीओ अत्यंत हृदयद्रावक असून, या पद्धतीने मुलांना शिकविणे, ओरडणे, मारणे चुकीचे असल्याचे मत मानसोपरचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी मांडले आहे. या वागणुकीमुळे मुलांमधील आत्मविश्वास कमी होऊन न्यूनगंड वाढत जातो. त्यांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होतो. यामुळे ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.

‘अशा’ व्हिडीओजचा ट्रेंड
यापूर्वीही मराठी भाषा शिकायची नाही, म्हणून रडणाºया लहानग्याचा त्यांच्या पालकांनी चित्रित केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता. त्याचप्रमाणे, प्ले ग्रूपमध्ये आपल्या आईच्या आठवणीने रडणाºया चिमुरडीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या चिमुरडीला इंग्रजी भाषा कळत नव्हती, त्यामुळे ती मराठी भाषेत संवाद साधताना दिसत होती. या सगळ्याचे चित्रण प्ले ग्रूपमधील शिक्षकांनी केले होते. मागील काही दिवसांपासून सोशल साइट्सवर प्रसिद्धी मिळविण्यासाठी, ‘व्हायरल’च्या स्पर्धेत जागा मिळविण्यासाठी असे व्हिडीओ चित्रित केले जात आहेत.

पालकांनी लहानग्यांना समजून घेतले पाहिजे. आजच्या जमान्यात स्पर्धा वाढली आहे, हे खरे आहे. मात्र, केवळ स्पर्धेतील खेळाडूप्रमाणे त्या मुलाला राबवून घेण्यापेक्षा, चांगल्या संस्कारांची शिकवण, विचार करण्याची क्षमता या गोष्टी शिकविल्या पाहिजेत. नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, बालपणी अशा परिस्थितीला सामोरे गेलेल्या मुला-मुलींची प्रगती खुंटते. त्यांच्यावर या वागणुकीचे खोल परिणाम होतात. त्यांचा भावनांक आणि बुद्ध्यांकावर परिणाम होतो, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे.
- डॉ. नूतन लोहिया, मानसोपरचारतज्ज्ञ

पालकांना विनवणी
विराटने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही वेळातच फेसबुक, यूट्युब, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटरवरून याविषयी नेटिझन्सनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय, पालकांना अशा पद्धतीने न शिकविण्याची विनवणीही केली. या सगळ्यात विराटची फौज असणाºया भारतीय संघातील रॉबिन उथप्पा, शिखर धवन, युवराज सिंग या खेळाडूंचाही समावेश होता.
 

Web Title:  'That' behavior is torture! The sounds of 'viral': Childhood memories appear in the future, with serious consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.