Gautami Patil: “होतेस का माझी परी?”; गौतमी पाटील होणार बीडची सूनबाई? चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 03:59 PM2023-05-30T15:59:16+5:302023-05-30T16:01:09+5:30

एका चाहत्याने गौतमी पाटीलला लव्ह लेटर लिहून थेट लग्नाची मागणी घातली आहे.

beed young wrote letter give marriage proposal to gautami patil | Gautami Patil: “होतेस का माझी परी?”; गौतमी पाटील होणार बीडची सूनबाई? चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी

Gautami Patil: “होतेस का माझी परी?”; गौतमी पाटील होणार बीडची सूनबाई? चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी

googlenewsNext

Gautami Patil: सबसे कातील... गौतमी पाटील... हे वाक्य आज अनेकांच्या ओठी ऐकायला मिळते. राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते. गौतमीच्या डान्सला, तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यातच आता प्रेमात वेडा झालेल्या एका चाहत्याने गौतमी पाटीलला थेट लग्नाची मागणी घातल्याचे सांगितले जात आहे. 

गौतमी, तुझ्या इच्छा-अटी सर्व मान्य, बोल तू होती का माझी परी? असे म्हणत आपल्या घराचा पत्ता तरुणाने दिला. इतकेच नाही, तर लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असेही त्याने म्हटले आहे. बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील यांनी गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, की 'गौतमी पाटील, तू भारी, तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. 

पत्र लिहिण्याचे कारण काय?

पत्र लिहिण्याचे कारण एका मुलाखतीत, तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना तू म्हणाली होतीस की, आता मी २५ वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा, अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे, तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे.

तरी तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे

तरी तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्यासोबत कुणी लग्नाला तयार नसले, तरी मी माणूसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय २६ वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये. पत्ता मु. पो. चिंचोली माळी, तालुका केज, जिल्हा बीड, या पत्त्यावर तू मला भेटायला ये, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, वराच्या शोधत असणारी गौतमी पाटील बीडच्या रोहन गलांडे पाटीलच्या पत्राची दखल घेणार का? या पत्राला गौतमी पाटील काय उत्तर पाठवणार किंवा देणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. 

 

Web Title: beed young wrote letter give marriage proposal to gautami patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.