औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर, कचरा प्रश्नी विरोधकांचे आंदोलन 'यशस्वी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 12:22 PM2018-03-15T12:22:47+5:302018-03-15T12:25:02+5:30

आज सकाळपासून विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते.

Aurangabad police commissioner sent on forced leave over garbage issue protest | औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर, कचरा प्रश्नी विरोधकांचे आंदोलन 'यशस्वी'

औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर, कचरा प्रश्नी विरोधकांचे आंदोलन 'यशस्वी'

googlenewsNext

मुंबई: औरंगाबादमधील कचरा प्रश्नाविरोधात विरोधकांनी गुरुवारी विधानसभेत पुकारलेले आंदोलन 'यशस्वी' झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच याप्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची घोषणा केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तत्पूर्वी आज सकाळपासून विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते. औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी महापालिका व पोलीस आयुक्तांना जबाबदार धरत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. 

आज सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील प्रत्येक प्रभागात त्या त्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, असा पर्याय यावेळी अजितदादांनी सुचवला. तसेच कचराप्रश्नावरून झालेल्या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेला लाठीमार ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे.जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावे. पोलिसांनी घराच्या काचा फोडल्या.स्वतः पोलिस एकप्रकारे दंगल करत होते. याठिकाणी एकप्रकारे माणुसकीचाच कचरा झाला आहे. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून निवृत्त न्यायधीशांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.
 

Web Title: Aurangabad police commissioner sent on forced leave over garbage issue protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.