फलज्योतिष ही तर आयात अंधश्रद्धा

By admin | Published: August 21, 2014 01:46 AM2014-08-21T01:46:19+5:302014-08-21T01:46:19+5:30

वास्तुशास्त्रप्रमाणोच फलज्योतिष हे सुद्धा मुळचे भारतातील नाही. ग्रीस-रोम येथून आयात केलेली ही अंधश्रद्धा आहे.

Astrology is the only imported superstition | फलज्योतिष ही तर आयात अंधश्रद्धा

फलज्योतिष ही तर आयात अंधश्रद्धा

Next
नाशिक : वास्तुशास्त्रप्रमाणोच फलज्योतिष हे सुद्धा मुळचे भारतातील नाही. ग्रीस-रोम येथून आयात केलेली ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा समूळ नष्ट करायची असेल तर अधिकाधिक विज्ञान प्रसाराची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत बोलताना केले. 
दाभोलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जॉ. नारळीकर यांचे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा समाज’ या विषयावर व्याख्यान झाले. नारळीकर यांनी युरोप आणि भारतामधील वैज्ञानिक प्रगतीचा आढावा घेताना सांगितले, की भारतीय विज्ञानाबद्दल फारशा नोंदी उपलब्ध नाहीत. युरोपात मात्र त्याचे पुरावे मिळतात. पृथ्वी फिरते की सूर्य याबाबतचे पुरावे शोधण्याचे काम अॅरिस्टॉटलपासून अॅरिस्टटसर्पयत केले गेले. परंतु पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सिद्ध होण्यासाठी 19 व्या शतकार्पयत वाट पाहावी लागली. युरोपात सामाजिक गरजा भागविण्यासाठी विज्ञानाचा उपयोग होताना दिसतो. दुर्दैवाने भारतात कला-साहित्याबरोबरच राजे महाराजांनी विज्ञानालाही राजाश्रय दिला असता तर कदाचित येथेही विज्ञान पुढे गेले असते. (प्रतिनिधी)
 
पत्रिका जुळविण्याचा प्रयोग अर्धवट
च्फलज्योतिषाची अचूकता टिपण्यासाठी 2क्क् कुंडल्या जमा करण्यात आल्या. त्यात 1क्क् मतिमंद, तर 1क्क् हुशार मुलांच्या होत्या. या कुंडल्या फलज्योतिष पाहणा:यांना देण्यात आल्या आणि कोण मतिमंद आणि कोण हुशार हे सांगण्याचे आवाहन केले गेले. त्यासाठी प्रत्येकी 4क् कुंडल्यांचे नमुने देण्यात आले. 4क् पैकी 28 कुंडल्यांचे उत्तर बरोबर आले तर फलज्योतिष हे शास्त्र असल्याचे मान्य करू, असे सांगितले गेले. परंतु सरासरी 4क् पैकी 17 उत्तरेच बरोबर आली. दाभोलकरांना लग्नपत्रिकांबाबतचाही प्रयोग करायचा होता. त्यावर कामही सुरू झाले होते. हे काम पुढे नेण्याची गरज असल्याचे नारळीकर म्हणाले. 

 

Web Title: Astrology is the only imported superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.