आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधनवाढीसह दोन हजारांचा बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 10:52 AM2023-11-02T10:52:16+5:302023-11-02T10:57:20+5:30

सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

Asha volunteers will have a sweet Diwali; 2000 plus bonus with salary increment | आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधनवाढीसह दोन हजारांचा बोनस

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधनवाढीसह दोन हजारांचा बोनस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई  : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या आशा स्वयंसेविकांना सात हजार रुपये मानधनवाढ, तीन हजार ६६४  गट प्रवर्तकांना प्रत्येकी सहा हजार २०० रुपये मानधनवाढ तसेच आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी केली.

आरोग्य भवन येथे याबाबत बैठक झाली. बैठकीस आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक सुभाष बोरकर उपस्थित होते.

आशा सेविकांना १५००० रुपये

  • राज्यात सन २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी आशा सेविकांना पाच हजार रुपये मानधन देण्यात येत होते. 
  • आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मानधनात सात हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. 
  • तसेच केंद्र शासन स्तरावरूनही तीन हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आता आशा सेविकांना दरमहा १५ हजार रुपये एकत्रित मानधन मिळेल.


आता गटप्रवर्तकांना २१,१७५ रुपये

  • राज्यात ३ हजार ६६४ गट प्रवर्तक कार्यरत आहेत. यापूर्वी गट प्रवर्तकांना ६ हजार २०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये ६ हजार २०० रुपये मानधनवाढ जाहीर केली आहे. 
  • केंद्र शासन स्तरावरूनही ८ हजार ७७५ रुपये मानधन मिळते. त्यामुळे गट प्रवर्तकांना आता दरमहा २१ हजार १७५ रुपये इतके एकत्रित मानधन मिळेल.

Web Title: Asha volunteers will have a sweet Diwali; 2000 plus bonus with salary increment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.