अरुण साधू यांना साहित्य जीवनगौरव

By admin | Published: December 22, 2016 04:40 AM2016-12-22T04:40:25+5:302016-12-22T04:40:25+5:30

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला

Arun Sadhu is conferred the literary career | अरुण साधू यांना साहित्य जीवनगौरव

अरुण साधू यांना साहित्य जीवनगौरव

Next

कोल्हापूर : अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांना मरणोत्तर ‘सामाजिक कार्य जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय विविध क्षेत्रांतील अन्य सात मान्यवरांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.
साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. फाउंडेशनतर्फे गेल्या २२ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा एक लाख रुपयांचा पुरस्कार नाट्यकर्मी अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. याचबरोबर मुंबईच्या अंजली जोशी यांना ‘विरंगी मी, विमुक्त मी’ या कादंबरीसाठी ललितग्रंथ पुरस्कार, पुण्याचे अरुण जाखडे यांच्या ‘इर्जिक’ या पुस्तकाला विशेषग्रंथ पुरस्कार; तर औरंगाबादचे अनिलकुमार साळवे यांना रा. शं. दातार नाट्यपुरस्कार दिला जाणार आहे. २५ हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या तीन पुरस्कारांचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arun Sadhu is conferred the literary career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.