अंतरा दास हत्याप्रकरणाची माहिती देणा-यास 25 हजारांचे बक्षीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 02:54 PM2017-08-11T14:54:51+5:302017-08-11T14:59:28+5:30

आयटी अभियंता अंतरा देवानंद दास या तरुणीच्या हत्याप्रकरणी माहिती देणा-यास पुणे ग्रामीण पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर

Antara das murder case pune | अंतरा दास हत्याप्रकरणाची माहिती देणा-यास 25 हजारांचे बक्षीस 

अंतरा दास हत्याप्रकरणाची माहिती देणा-यास 25 हजारांचे बक्षीस 

Next

पिंपरी, दि. 11 - आयटी अभियंता अंतरा देवानंद दास या तरुणीच्या हत्याप्रकरणाची माहिती देणा-यास पुणे ग्रामीण पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सात महिन्यांपुर्वी तळवडे येथे अंतरा दासचा खून झाला होता.  याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटकही केली होती. मात्र, तपासाच्या दृष्टीने पुरेशी माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणी कोणाला अधिक माहिती असल्यास माहिती देण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे. योग्य माहिती देणा-यास पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 
काय आहे नेमकी घटना ?
कॅपजेमिनी कंपनीतील महिला अभियंता अंतरा दासची डिसेंबर 2016 मध्ये हत्या झाली होती. तळवडे एमआयडीसी परिसरात भर रस्त्यात रात्री तिची धारदार शस्त्राने भोसकडून हत्या करण्यात आली.  याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला पोलिसांनी बंगळुरुतून अटक करण्यात आली होती. संतोष हा मूळचा बिहारचा असून तो बंगळुरुमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होता.
अंतरा बंगळुरूमध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. तेव्हा पासून तो  तिच्या संपर्क होता. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता. तसेच त्याने अंतराला लग्नाची मागणीही घातली होती.  मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. अंतराने वेळोवेळी संतोषचा मोबाईल क्रमांक "ब्लॉक" केला होता. तसेच अंतरा पुण्यात कुणासोबात फिरत आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्याचे त्याने मित्रांना सांगितले होते.
अंतरा ही तळवडे येथील कॅपजेमिनी या कंपनीत एप्रिलपासून नोकरी करत होती. नेहमी कंपनीची कॅब घेऊन जाणारी अंतरा 23 डिसेंबर रोजी रात्री तळवडे येथील केएनबी चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यावेळी तेथून जाणा-या सत्येंद्र सिंपी यांनी तिला त्वरित उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. 

 
 

Web Title: Antara das murder case pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.