वन अबव्हच्या तिन्ही संचालकांना 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 03:53 PM2018-01-11T15:53:17+5:302018-01-11T15:53:38+5:30

All three directors of One Above will be taken to the police custody till 17th | वन अबव्हच्या तिन्ही संचालकांना 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी

वन अबव्हच्या तिन्ही संचालकांना 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी

Next

मुंबई - कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 'वन अबव्ह' पबच्या फरार मालकांना बेड्या ठोकल्या आहेत. वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकरला न्यायालयात हजर केले असता, त्यांना 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोअर परळ परिसरातील कमला मिल्स अग्नितांडवप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वीच 'वन अबव्ह' पबच्या तिस-या मालकालाही अटक केली होती. कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेनंतर फरार असलेला तिसरा आरोपी अभिजित मानकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी 'वन अबव्ह' पबचे दोन मालक कृपेश संघवी आणि जिगर संघवी यांना वांद्रे परिसरातून अटक केली होती.  याआधी या प्रकरणी मोजोसचा मालक युग पाठक याला पोलिसांनी अटक केली होती. 14 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वन अबव्हचे संचालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि व्यवस्थापक अभिजित मानकर यांच्यासोबत मोजोसचे मालक युग पाठक, युग तुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील आरोपी फरार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करून युग पाठक, हॉटेल व्यावसायिक विकास कारिया यांना अटक केली आहे. तसेच पबच्या व्यवस्थांपकांवरही अटकेची कारवाई झाली आहे. तर युग तुली याला हैदराबाद येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाला मंगळवारी (9 जानेवारी) पोलिसांनी अटक केली होती. 'वन अबव्ह'च्या मालकांना पोलिसांपासून वाचवण्याचा आणि स्वत:च्या घरात आसरा देण्याचा आरोप त्याच्यावर आहे. विशाल करियाकडूनच पसार असलेला आरोपी अभिजीत मानकरची कारही जप्त करण्यात आली होती.

Web Title: All three directors of One Above will be taken to the police custody till 17th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.