‘आदर्श’ दिलासा : काँग्रेसमध्ये उत्साह,दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली

By अतुल कुलकर्णी | Published: December 23, 2017 03:16 AM2017-12-23T03:16:15+5:302017-12-23T04:08:52+5:30

टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.

 'Adarsh' console: Excitement in Congress, movement of both Congress together | ‘आदर्श’ दिलासा : काँग्रेसमध्ये उत्साह,दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली

‘आदर्श’ दिलासा : काँग्रेसमध्ये उत्साह,दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली

Next

मुंबई : टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.
हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली चालू असताना, हा निर्णय आल्यामुळे चव्हाण यांचे पद अधिक बळकट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौºयावर घेऊन जाणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही अचानक आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी थेट मुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राष्टÑवादीबाबत भाषा बदलत, यापुढे एकत्रित निवडणुका लढविल्या पाहिजेत, असा सूर आळविला आहे.
२०१४च्या निवडणुकीत महाराष्टÑात भाजपाला जरी १२२ जागा मिळाल्या, तरी त्यांच्या मतांची टक्केवारी २७.८१ होती. त्याउलट दोन्ही काँग्रेसची एकत्रित टक्केवारी ३५.१९ एवढी होती.
आता शिवसेनाही भाजपाच्या विरोधात असून, त्यांच्या मतांची टक्केवारी १९.३५ होती. याचा अर्थच भाजपाच्या विरोधात ५४.५४ टक्के मते होती, हे विसरून चालणार नाही, असे चव्हाण यांचे मत आहे.
आज राज्यात कर्जमाफी, शेतकºयांच्या वीजबिलावरून सरकारच्या विरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यातच गुजरातचा निकाल, टू जी घोटाळ्यातून काँग्रेसची मुक्तता, अशोक चव्हाण यांना मिळालेला दिलासा, राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना अशोक चव्हाणांची बाजू घेत दिलेल्या प्रतिक्रिया, यामुळे दोन्ही काँग्रेसमधील कटुता कमी होत चालल्याचे दिसून येते.
मात्र, भाजपाच्या नेत्यांची मते वेगळी आहेत. जरी अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला असला, तरी आदर्शमध्ये त्यांनी आणि ज्या कोणी अधिकाराचा वापर करत, तेथे फ्लॅट घेतले, त्या आरोपातून त्यांची सुटका झालेली नाही, असे एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.
आमचेही राजकीय डावपेच कमी पडत आहेत, असे सांगून, तो नेता म्हणाला, काँग्रेस, राष्टÑवादीचा ज्या दिवशी नागपुरात मोर्चा निघाला, त्याच दिवशी सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झाल्याने, भाजपा सुडाचे राजकारण करत आहे, असा संदेश आमच्या विरोधात गेला. तो आम्ही टाळू शकलो असतो, असेही तो नेता म्हणाला.
बाळासाहेबांच्या चित्रपटाची तारीख सूचक-
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट २३ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले़ लोकसभा निवडणुका मे, जून २०१९ मध्ये होणे अपेक्षित आहे़ विधानसभा निवडणुका त्याच वेळी घेण्याचेही भाजपाच्या वरिष्ठांनी घाटले आहे़ त्यामुळे चित्रपटाची तारीख सूचक आहे़

Web Title:  'Adarsh' console: Excitement in Congress, movement of both Congress together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.