व्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 05:23 PM2018-05-27T17:23:13+5:302018-05-27T17:28:28+5:30

शिवसेनेनं ऑडिओ क्लिप एडिट करून दाखवली. व्हिडीओ क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास निवडणूक आयोगानं माझ्यावर कारवाई करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Action taken if video finds some offensive - Chief Minister | व्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री

व्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री

मुंबई- शिवसेनेनं ऑडिओ क्लिप एडिट करून दाखवली. व्हिडीओ क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास निवडणूक आयोगानं माझ्यावर कारवाई करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. संपूर्ण ऑडिओ क्लिप मी आयोगाकडे सादर केली आहे. साम, दाम, दंड, भेदचा अर्थ हवा असल्यास आम्ही शिकवू, असं थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिलं आहे. मी क्लिप उघड केल्यानं जाणीवपूर्वक क्लीप एडिट करून वापरली.

मोदी सरकारच्या कार्यकाळाला 4 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मी 80 टक्के विकास, 20 टक्के राजकारण करतो. निवडणुकीत विरोधक अपप्रचार करतात, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील 3 कोटी 98 लाख कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळालं असून, राज्यात 2 कोटी 18 लाख जनधन खाती सुरू करण्यात आली आहे. 15 हजार ग्रामपंचायती इंटरनेटनं आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. 20 राज्यांत पासपोर्ट कार्यालयं सुरू केल्याचं सांगत केंद्रातील मोदी सरकारचंही तोंडभरून कौतुक केलं आहे.

ग्रोथ रेटचा आकडा दरवर्षी वरखाली होत असतो. देशाच्या इतिहासात मागच्या वर्षी भारतात उत्पादन प्रचंड वाढलंय. उत्पादनासह उत्पादकता वाढवण्याची गरज आहे. केंद्रानं चांगल्या योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकार राज्यांना योजना देतो, त्या योजना राबवण्यात राज्यांची महत्त्वाची भूमिका असते.

Web Title: Action taken if video finds some offensive - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.