अबब...‘५००’च्या १७ लाख बनावट नोटा !

By admin | Published: November 9, 2016 07:47 PM2016-11-09T19:47:20+5:302016-11-09T19:47:20+5:30

केंद्र शासनाने काळ्या पैशावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत बुधवारपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे चलन बंद केले आहे. बाजारात बनावट नोटांचे वाढते प्रमाण हे देखील

Above ... 17 million fake notes of '500'! | अबब...‘५००’च्या १७ लाख बनावट नोटा !

अबब...‘५००’च्या १७ लाख बनावट नोटा !

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 09 -  केंद्र शासनाने काळ्या पैशावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत बुधवारपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे चलन बंद केले आहे. बाजारात बनावट नोटांचे वाढते प्रमाण हे देखील यामागचे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. गेल्या काही वर्षांपासून बनावट नोटांमुळे देशाची अर्थव्यवस्था पोखरुन निघाली होती. मागील ७ वर्षात वर्षांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ लाख बनावट नोटा आढळून आल्या. यात ५०० व १००० रुपयांच्या मिळून २६ लाखांहून अधिक बनावट नोटांचा समावेश होता.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बनावट नोटांसंदर्भात भारतीय रिजर्व्ह बँकेकडे विचारणा केली होती. २००९ पासून देशात किती बनावट नोटा आढळल्या, त्यांचे मूल्य किती होते, सर्वाधिक बनावट नोटा कोणत्या होत्या इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल २००९ ते डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये देशभरात ३४ लाख ३ हजार ३१८ बनावट नोटा आढळून आल्या. यांचे मूल्य १५९ कोटी ४४ लाख ७३ हजार २५ इतके आहे. २०१४-१५ या कालावधीत सर्वात जास्त ५ लाख ९४ हजार ४४६ बनावट नोटा आढळल्या. 
मिळालेल्या माहितीनुसार,  या कालावधीत देशभरातील विविध बँकांमध्ये  ३४ लाख ३ हजार ३१८ बनावट नोटा सापडल्या. यात रुपये १०, २०, ५०, १००, ५०० व १००० रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे. यात ५०० रुपयांच्या सर्वात जास्त बनावट नोटा आढळून आल्या. यांची सख्या १७ लाख ५७ हजार ४३४ इतकी असून मूल्य ८७ कोटी ८७ लाख १७ हजार इतके आहे. तर १००० रुपयांच्या ६ लाख १ हजार २६१ बनावट नोटा आढळून आल्या. यांचे मूल्य ६१ कोटी ६२ लाख ६१ हजार इतके आहे. 
 
बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण वाढीस
२०१२ सालापासून बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१२-१३ मध्ये ४ लाख ९८ हजार २५२ तर २०१३-१४ मध्ये ४ लाख ८८ हजार २७३ बनावट नोटा आढळून आल्या. २०१४-१५ मध्ये हे प्रमाण ५ लाख ९४ हजार ४४४ वर गेले. तर २०१५ साला अखेरीपर्यंत ४ लाख ६४ हजार १०९ बनावट नोटा आढळल्या.
 
नोट     संख्या
१०        १२५३
२०     ९४१
५०    ६५,४७७
१००   ९,६१,८९८
५००       १७,५७,४३४
१०००६,१६,२६०

Web Title: Above ... 17 million fake notes of '500'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.