ग्रामीण भागात गर्भपाताचे प्रमाण अधिक; ६० हजारांहून अधिक महिलांचे नैसर्गिक गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:34 AM2018-06-06T01:34:31+5:302018-06-06T01:34:31+5:30

गेल्या वर्षभरात राज्यभरात ६० हजार ४९५ नैसर्गिक गर्भपात झाले. त्यात शासकीय रुग्णालयांमधील गर्भपातांची संख्या ३४ हजार ५६३ होती, तर खासगी रुग्णालयांमध्ये २५ हजार ९३२ गर्भपातांची नोंद करण्यात आली.

 Abortion rate in rural areas is high; Natural abortion of more than 60 thousand women | ग्रामीण भागात गर्भपाताचे प्रमाण अधिक; ६० हजारांहून अधिक महिलांचे नैसर्गिक गर्भपात

ग्रामीण भागात गर्भपाताचे प्रमाण अधिक; ६० हजारांहून अधिक महिलांचे नैसर्गिक गर्भपात

googlenewsNext

मुंबई : गेल्या वर्षभरात राज्यभरात ६० हजार ४९५ नैसर्गिक गर्भपात झाले. त्यात शासकीय रुग्णालयांमधील गर्भपातांची संख्या ३४ हजार ५६३ होती, तर खासगी रुग्णालयांमध्ये २५ हजार ९३२ गर्भपातांची नोंद करण्यात आली. यातील मुंबई शहर-उपनगरात एकूण ११ हजार ७६३ गर्भपात झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, राज्यभरात झालेल्या गर्भपातांमध्ये ग्रामीण भागात होणाऱ्या गर्भपाताची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकेडवारीनुसार, गेल्या वर्षभरात देशभरात ५ लाख ५५ हजार २१३ गर्भपात झाले. त्यात देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे ७५ हजार २०२ गर्भपात झाल्याची नोंद आहे. त्यानंतर महाराष्ट्र व तृतीय स्थानी राज्यस्थानमध्ये ५७ हजार २०६ गर्भपात झाल्याचे आढळून आले आहे. देशाचा विचार करता शहरी भागातील गर्भपाताची संख्या ७२ हजार ६४३ असून ग्रामीण भागातील संख्या ४ लाख ८२ हजार ५७० इतकी लक्षणीय आहे.
मुंबईत ११ हजार इतके गर्भपात, पुण्यात ८ हजार ५७१ आणि ठाण्यात ५ हजार ५२८ गर्भपातांची नोंद आहे. या अहवालातील निरीक्षणानुसार, देशभरात होणाºया १० गर्भपातांपैकी एक प्रकरण राज्यातील आहे. याविषयी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कौशिक सिंग यांनी सांगितले, वारंवार होणाºया गर्भपातांपैकी जवळजवळ ८० टक्के गर्भपात हे गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवड्यांतच होतात. यांना फर्स्ट ट्रायमेस्टर अबॉर्शन्स असे म्हणतात. या प्रकारामधील गर्भपातांपैकी ५० ते ६० टक्के गर्भपात हे गर्भातील गुणसूत्रांच्या बिघाडामुळे घडतात. अपंग मूल जन्म घेऊ नये म्हणून निसर्गाने केलेली ही व्यवस्था आहे. याशिवाय गरोदर स्त्रीला मलेरिया, कावीळसारखा गंभीर आजार, गुप्त आजार, पोटावर जोरात पडणे, प्रजोत्पादक अवयवांमध्ये काही समस्या असेल तर गर्भपात (मिसकॅरेज) होऊ शकतो, असे सिंग यांनी सांगितले.
तर, गर्भपात त्या दाम्पत्यावर, विशेषत: स्त्रीवर प्रचंड शरीरिक आणि मानसिक आघात करणारे ठरतात. ती अक्षरश: कोलमडून जाण्याची शक्यता असते. या मानसिक अवस्थेचा परिणाम पुढच्या गर्भारपणावर होऊ शकतो. पण काही विशिष्ट चाचण्या आणि योग्य औषधोपचार यामुळे त्यावर मात करता येते आणि गर्भारपण साध्य होते, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नयन शहा यांनी दिली.

Web Title:  Abortion rate in rural areas is high; Natural abortion of more than 60 thousand women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.