84 वर्षांच्या ‘लखोबा लोखंडे’ला पुण्यातून अटक, ठाण्यातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून उकळले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 07:28 PM2017-10-17T19:28:05+5:302017-10-17T19:30:10+5:30

लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 44 वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख 78 हजार रुपये उकळणा-या 84 वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामटयाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

84-year-old Lakhoba Lokhande arrested from Pune, lakhs of rupees in marriage of Thane woman | 84 वर्षांच्या ‘लखोबा लोखंडे’ला पुण्यातून अटक, ठाण्यातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून उकळले लाखो रुपये

84 वर्षांच्या ‘लखोबा लोखंडे’ला पुण्यातून अटक, ठाण्यातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून उकळले लाखो रुपये

Next

ठाणे - लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 44 वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख 78 हजार रुपये उकळणा-या 84 वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामटयाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

पुण्याच्या चिंचवड (मूळ रा. राधाकृष्ण कॉलनी, जळगाव) भागात राहणाºया या भामट्याने ठाण्याच्या शिवाजीनगर भागातील या महिलेला 4 फेब्रुवारी 2016 पासून लग्नाचे आमिष दाखवले. चिटणीस याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वास्तव्याला असलेल्या स्वाती राणे (55) या महिलेच्या मदतीने 70 हजारांची रोकड घेतली. तसेच वेगवेगळया कारणांसाठी तिच्या बँक खात्यातूनही तीन लाख 38 हजारांची रक्कम काढली. तिच्या भावाकडूनही चार लाखांची रक्कम घेऊन फसवणूक केली. वारंवार मागणी करूनही चिटणीस पैसे परत करत नाही किंवा लग्नाचेही नाव काढत नसल्याने या भामटयाविरुद्ध तिने अखेर 28 सप्टेंबर 2017 रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आणि उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने त्याला पुण्यातून अटक केली आहे. त्याला २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.

लग्न न करता घेतले कोरे धनादेश-
आपण 55 वर्षीय असल्याचे भासवून शिवचंद्रने ठाण्यातील या महिलेकडून 17  कोरे धनादेश स्वाक्षरी करून घेतले. त्याने ते स्वाती राणे हिला वेगवेगळया खरेदीसाठी आणि लघुउद्योगासाठी दिले. या धनादेशाद्वारे त्याने तीन लाख 38  हजार 69 रुपयांची खरेदीही केली. तिच्या नातेवाईकांकडूनही प्रत्येकी 70 हजार असे एक लाख 40 हजार तसेच तिच्या भावाकडून चार लाख रुपये घेतले. यातूनच त्याने पवई येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे घर खरेदीसाठी 18 लाख 70 हजार रुपये भरल्याची बनावट पावती त्याने तिला दाखविली.

यापूर्वीही फसवणुकीचे दोन गुन्हे-
पुण्याच्या पिंपरीतील विजय वराडे यांनाही इलेक्ट्रीक रिसर्च सेंटरचे टेंडर काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून त्याने दोन लाख रुपये घेतले होते. याप्रकरणीही 13 जुलै 2017 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
मुंबईच्या वाकोला येथील उज्ज्वला जगदाळे यांच्याकडून शिवचंद्र आणि स्वाती राणे यांनी खारघर येथे घर घेऊन देण्याच्या नावाखाली 26 लाख रुपये उकळले. वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी 3फेब्रुवारी 2017 रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

Web Title: 84-year-old Lakhoba Lokhande arrested from Pune, lakhs of rupees in marriage of Thane woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.