६८ वर्षं ते बेट 'वाट' बघतंय..

By admin | Published: March 1, 2016 02:57 PM2016-03-01T14:57:18+5:302016-03-01T14:58:24+5:30

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे.

For 68 years, I see the island. | ६८ वर्षं ते बेट 'वाट' बघतंय..

६८ वर्षं ते बेट 'वाट' बघतंय..

Next
>- सचिन नारकर 
जैतापूर दि. १ - देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली,  केंद्रीय अर्थमंत्री कॉर्पोरेटकडून खेड्याकडे जायची भाषा करू लागले आहेत. पण प्रस्तावित अणुऊर्जा केंद्रामुळे विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या जैतापूरलगतचे एक बेट अजूनही एका रस्ता मिळण्याची वाट पाहात आहे. एका छोट्या सोयीची वाट पाहणा-या डोळ्यांमधले पाणी आटले, तरी प्रशासन वा लोकप्रतिनिधींना पाझर फुटलेला नाही. 
चारही बाजूंनी जैतापूरच्या खाडीने वेढलेल्या या जुवे बेटाकडे ना संख्याबळ आहे, ना मतांचा गठ्ठा आहे. २०११च्या जनगणनेनुसार जुवे बेटावरची वस्ती अवघी १०१! या इवल्याशा बेटाला स्वातंत्र्य सैनिकांचे गाव अशी ओळख आहे, तंटामुक्ती हा या लोकवस्तीचा स्वभाव आहे. इथला शिमग्याचा सण प्रसिद्ध आहे. त्यावेळी वाजविली जाणारी जुन्या पद्घतीची वाद्ये आजही जैतापूर आगरवाडीच्या पट्ट्याचे आकर्षण आहे. चारही बाजूने खारे पाणी पण बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यटनासाठी आदर्श म्हणावे असे हे बेट मुख्य भूमीशी नाळ जोडण्यासाठी टाहो फोडत आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सॅम पिट्रोडांच्या मदतीने साकारू पाहात असलेल्या दळणवळणाच्या क्रांतीला अवघा देश १९८६-८७च्या काळात सामोरा जात होता. नेमक्या त्याच काळात धाऊलवल्ली गावाशी हे बेट एका जोडरस्त्याने जोडण्याचे काम सुरू झाले. ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. राघव वाडी पासून रस्ता झालेला आहे पण वादामुळे बंद करण्यात आला आहे. आमदार खासदारांनी या समस्कयेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हे गाव वैद्यकीय सेवा, रोजचा लागणारा बाजार, दळणवळणच्या दृष्टीने अजूनही मागास आहे. इतकेच नव्हे, तर वानर, डुक्कर, कोल्हे व इतर जंगली श्वापदंचा त्रास सहन करावा लागत आहे.
आजही या बेटावर जायला छोट्या होडीचा वापर करावा लागतो. शाळेतील मुले, अाबाल वृध्द, आजारी व्यक्तीही असाच प्रवास करतात. याबाबतीत सरकारला फुटेल का हो पाझर... या प्रश्नाचा शोध ही १०१ माणसे अव्याहत घेत आहेत. 
या पट्ट्यातील कोकणी माणूस मात्र अभिमानाने सांगतो....हे एक बेट आहे....याच्या चारही बाजूने खारे पाणी आहे....आत गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत! 
त्यात आसवांचा खारटपणा मिसळण्याच्या बेतात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील कोकणी माणूस या बेटाच्या रस्त्यासाठी एकवटू पाहात आहे.
 

Web Title: For 68 years, I see the island.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.