धरणांमध्ये अवघा ६० टक्के पाणीसाठा, मराठवाड्यावर जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 03:53 AM2018-10-27T03:53:32+5:302018-10-27T03:53:41+5:30

राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे.

60 percent water stock in dams, water supply in Marathwada | धरणांमध्ये अवघा ६० टक्के पाणीसाठा, मराठवाड्यावर जलसंकट

धरणांमध्ये अवघा ६० टक्के पाणीसाठा, मराठवाड्यावर जलसंकट

Next

पुणे : राज्यात गतवर्षापेक्षा १५ टक्के कमी म्हणजे अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा असून तो सुमारे आठ महिने पुरवावा लागणार आहे. त्यावरच पिण्यासाठी, शेती व उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान प्रशासनावर असणार आहे. मराठवाड्यात तर केवळ २३.७५ टक्के साठा असल्याने आवर्षणाचे संकट गडद बनले आहे.
राज्यातील ३ हजार २६६ लहानमोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असून, उपयुक्त पाणीसाठा ४०
हजार ८२८ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा २६ आॅक्टोबर अखेरीस धरणांमध्ये अवघा २४ हजार ८७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे आणि कोकण विभागात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगली आहे. मराठवाड्याची उपयुक्त पाण्याची क्षमता ७ हजार ३७४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १ हजार ७५१ दशलक्ष घनमीटर (३२.७५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी पाणीसाठ्याचे प्रमाण ७० टक्के होते. नाशिकची क्षमता ५ हजार ९३४ दशलक्ष घनमीटर असून, ३ हजार ७९९ (६४ टक्के), तर नागपूर विभागाच्या ४ हजार ६०७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १ हजार ७४३ दशलक्ष घनमीटर (३७.८४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षी ८४.२८ आणि नागपूरमध्ये ४२.२१ टक्के पाणीसाठा होता.
>राज्यातील प्रमुख धरणांची स्थिती
धरण उपयुक्त साठा जलसाठ्याची गेल्यावर्षीची
(दशलक्ष घनमीटर) टक्केवारी टक्केवारी
तिल्लारी-सिंधुदूर्ग ३८६ ८६.२१ ९५.३२
गोसीखुर्द-भंडारा ३७५ ५०.६६ २०.३८
तातलाडोह-नागपूर १५० १४.७५ ३३.९७
निम्न वर्धा ५७ २६.२८ ५८.८२
भंडारदरा-अहमदनगर २४९ ८१.८३ १००
मुळा-अहमदनगर ४१५ ६८.२२ १००
गिरणा-नाशिक २४६ ४६.९४ ७१.७७
दूधगंगा-कोल्हापूर ६४० ९४.२४ १००
राधानगरी-कोल्हापूर २०५ ९३.१८ ९४.४२
डिंभे-पुणे ३२२ ९१ १००
पवना-पुणे २१७ ७९ ८७.८९
पानशेत २८५ ९४.५४ १००
भाटघर ६५७ ९८.७७ १००
वरसगाव ३५९ ९८.९७ १००
कोयना २४२० ८५.३६ ९९.१६
उजनी १३८३ ९१.१८ १००

Web Title: 60 percent water stock in dams, water supply in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण