दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 07:44 AM2023-10-10T07:44:53+5:302023-10-10T07:45:41+5:30

ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना असेल. 

6 thousand if the second child is a girl; Prime Minister Matruvandana-2 scheme announced in the state | दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर

दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर

googlenewsNext

मुंबई : पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची सरकारी मदत कायम ठेवतानाच आता दुसरे अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये राज्य सरकार देईल. पंतप्रधान मातृवंदना योजना-२ लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी केली. आता हे पाच हजार रुपये दोन टप्प्यातच दिले जातील. 

कुणाला मिळेल लाभ? -
- ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना असेल. 
- दुसरे अपत्य जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.

Web Title: 6 thousand if the second child is a girl; Prime Minister Matruvandana-2 scheme announced in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.