मेडिकलच्या ४३ विद्यार्थ्यांना चार कोटी ८० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:35 AM2019-01-18T05:35:49+5:302019-01-18T05:35:55+5:30

जातवैधता प्रमाणपत्रे निघाली बनावट

43 medical students fined for fake cast certificate | मेडिकलच्या ४३ विद्यार्थ्यांना चार कोटी ८० लाखांचा दंड

मेडिकलच्या ४३ विद्यार्थ्यांना चार कोटी ८० लाखांचा दंड

Next

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमात बनावट जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारे राखीव जागांवर प्रवेश मिळविणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांचे पितळ उघकीस आले. या विद्यार्थ्यांना वैद्यकीय संचालनालयाने ४ कोटी ८० लाखांचा दंड ठोठावला. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातूनच बहिष्कृत करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.
यामध्ये एमबीबीएस, बीडीएसचे ३८ तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमएस, एमडी) ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बनावट प्रमाणपत्रांद्वारे काहींनी प्रवेश घेतल्याबाबत बिरसा क्रांतिदलाने तक्रार केली होती. त्याची दखल घेत शिक्षण संचालनालयाने या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले. मात्र विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका करून प्रवेश रद्दच्या निर्णयास अंतरिम स्थगिती मिळविली. त्यानंतर फेब्रुुवारीमध्ये उच्च न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांच्या रिट याचिका फेटाळल्या. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने बिरसा क्रांतीदलाने संचालनालयाकडे पाठपुरवा केल्यानंतर कारवाईचे आदेश महाविद्यालयांना मिळाले आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख, तर पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २० लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
...................
- या महाविद्यालयांना मिळाले आदेश
मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, सेंट जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय परळ, एच. बी. टी., टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, नायर दंत महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय आणि के. जे. सोमय्या फिजीओथेरपी महाविद्यालय यांचा समावेश आहे. यशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली, एम. आय. एम. ई. आर. मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे, या महाविद्यालयात बनावट जातवैद्यता प्रमाणपत्रावर प्रवेश घेतलेले विद्यार्थी आढळले.
..................
बॉक्स
राज्यात बनावट जातवैधता प्रमाणपत्र वाटणारे रॅकेट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गृह विभागाने या रॅकेटचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी बिरसा क्रांतीदलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केली आहे.मेडिकलच्या ४३ विद्यार्थ्यांना चार कोटी ८० लाखांचा दंड
जातवैधता प्रमाणपत्रे निघाली बनावट

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमात बनावट जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारे राखीव जागांवर प्रवेश मिळविणाºया ४३ विद्यार्थ्यांचे पितळ उघकीस आले. या विद्यार्थ्यांना वैद्यकीय संचालनालयाने ४ कोटी ८० लाखांचा दंड ठोठावला. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातूनच बहिष्कृत करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.
यामध्ये एमबीबीएस, बीडीएसचे ३८ तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमएस, एमडी) ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बनावट प्रमाणपत्रांद्वारे काहींनी प्रवेश घेतल्याबाबत बिरसा क्रांतिदलाने तक्रार केली होती. त्याची दखल घेत शिक्षण संचालनालयाने या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले. मात्र विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका करून प्रवेश रद्दच्या निर्णयास अंतरिम स्थगिती मिळविली. त्यानंतर फेब्रुुवारीमध्ये उच्च न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांच्या रिट याचिका फेटाळल्या. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने बिरसा क्रांतीदलाने संचालनालयाकडे पाठपुरवा केल्यानंतर कारवाईचे आदेश महाविद्यालयांना मिळाले आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख, तर पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २० लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
...................
- या महाविद्यालयांना मिळाले आदेश
मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, सेंट जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय परळ, एच. बी. टी., टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, नायर दंत महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय आणि के. जे. सोमय्या फिजीओथेरपी महाविद्यालय यांचा समावेश आहे. यशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली, एम. आय. एम. ई. आर. मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे, या महाविद्यालयात बनावट जातवैद्यता प्रमाणपत्रावर प्रवेश घेतलेले विद्यार्थी आढळले.
..................
बॉक्स
राज्यात बनावट जातवैधता प्रमाणपत्र वाटणारे रॅकेट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. गृह विभागाने या रॅकेटचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी बिरसा क्रांतीदलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केली आहे.

Web Title: 43 medical students fined for fake cast certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.