मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज दुपारी १२ ते २ ब्लॉक; वाहतूक पूर्णत: बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:01 AM2024-02-13T06:01:18+5:302024-02-13T06:01:58+5:30

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना आणि बसला खोपोली एक्झिट किलो मीटर ३९ येथून वळण घेता येईल. 

12 to 2 blocks today on the Mumbai-Pune Expressway; Traffic will be completely closed | मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज दुपारी १२ ते २ ब्लॉक; वाहतूक पूर्णत: बंद राहणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज दुपारी १२ ते २ ब्लॉक; वाहतूक पूर्णत: बंद राहणार

मुंबई : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबईकडील वाहिनीवर गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आज, मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान करण्यात येणार आहे. 

गॅन्ट्री बसविताना या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील वाहन चालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुण्याहुन मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना मुंबई वाहिनीवर लेन किलोमीटर ५५ वरून वळण घ्यावे लागेल. मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या जुना पुणे - मुंबई मार्गावरून जाता येईल. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना आणि बसला खोपोली एक्झिट किलो मीटर ३९ येथून वळण घेता येईल. 

Web Title: 12 to 2 blocks today on the Mumbai-Pune Expressway; Traffic will be completely closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.