फटाका फॅक्टरीचा मालक मुलासह दिल्लीला पळून जात होता; पोलिसांनी तिघांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:12 PM2024-02-06T23:12:13+5:302024-02-06T23:25:24+5:30

मध्य प्रदेशच्या हरदा येथील फटाका फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट होऊन ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Madhya Paradesh Harda firecracker factory owner was fleeing to Delhi with his son; Police arrested three people | फटाका फॅक्टरीचा मालक मुलासह दिल्लीला पळून जात होता; पोलिसांनी तिघांना केली अटक

फटाका फॅक्टरीचा मालक मुलासह दिल्लीला पळून जात होता; पोलिसांनी तिघांना केली अटक

मध्य प्रदेशच्या हरदा येथील फटाका फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट होऊन ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. राजकीय वजन असल्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही फॅक्टरी अवैधरित्या सुरु होती. यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. फरारी झालेला फॅक्टरीचा मालक दिल्लीला पळून जात असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये राजेश अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफीक खान यांचा समावेश आहे. राजेशला राजगढ जिल्ह्याच्या सारंगपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. कारमधून तो दिल्लीच्या दिशेने जात होता, यावेळी त्याला अटक करण्य़ात आली आहे. 

हरदा येथील बेकायदेशीर फटाका कारखान्याचा संचालक राजीव अग्रवाल आणि त्याच्या मुलाला सारंगपूर येथे वेन्यू कारमधून अटक करण्यात आली आहे. स्फोटानंतर आरोपी फरार झाला होता. सारंगपूर पोलिसांनी मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री 9 वाजता राजीव अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफिक यांना अटक केली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी तिन्ही आरोपींना आयपीसीच्या कलम 304, 308, 34 आणि स्फोटक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत अटक केली आहे.

या स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 175 जण जखमी झाले आहेत. एकामागोमाग एक असे स्फोट होत होते. आगीची तीव्रता एवढी होती की आजुबाजुला राहणारे, मोबाईलद्वारे शूटिंग करणारे देखील जखमी झाले आहेत. 

Web Title: Madhya Paradesh Harda firecracker factory owner was fleeing to Delhi with his son; Police arrested three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.