डॉ. मोहन यादवही योगींसारखेच ॲक्शनमोडवर! मांस दुकानांवर बुलडोझरची कारवाई; उज्जैनमध्ये कामाचा धडाका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:34 PM2023-12-18T12:34:14+5:302023-12-18T12:36:11+5:30

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव एका अॅक्शनमोडवर आले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाऊलावर पाऊलं ठेवले आहे.

cm dr mohan yadav following yogi adityanath model and the myth of ujjain also broken like noida | डॉ. मोहन यादवही योगींसारखेच ॲक्शनमोडवर! मांस दुकानांवर बुलडोझरची कारवाई; उज्जैनमध्ये कामाचा धडाका सुरू

डॉ. मोहन यादवही योगींसारखेच ॲक्शनमोडवर! मांस दुकानांवर बुलडोझरची कारवाई; उज्जैनमध्ये कामाचा धडाका सुरू

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव एका अॅक्शनमोडवर आले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाऊलावर पाऊलं ठेवले आहे. त्यांनी  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच उघड्यावर मांसविक्री आणि धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या. यानंतर सीएम मोहन यादव यांनी उज्जैनमध्ये एक रात्र घालवून अनेक दशके जुनी समज मोडली, ज्याप्रमाणे सीएम योगींनी नोएडाला भेट देऊन अंधश्रद्धेची भीती संपवली होती, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यादव यांनी उज्जैनमध्ये केले. 

Corona Virus : केरळमध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; नव्या सबव्हेरिएंटचा मोठा धोका, रुग्णांमध्ये वेगाने वाढ

१३ डिसेंबर रोजी राजधानी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच डॉ. मोहन यादव भगवान महाकालेश्वराची पूजा करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी उज्जैन येथे पोहोचले होते. त्यानंतर राजधानी भोपाळला परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला की, कोणत्याही प्रकारच्या धार्मिक स्थळ आणि इतर ठिकाणी विहित नियमांनुसारच लाऊड ​​स्पीकर आणि डीजे वापरता येतील. याचा तपास करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये उड्डाण पथके तयार करण्यात येणार आहेत. इतकंच नाही तर योगी सरकारने ज्याप्रमाणे यूपीमध्ये उघड्यावर मांसविक्रीवर बंदी घातली, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्येही विनापरवाना उघड्यावर मांस आणि मासे विक्रीवर बंदी घालण्यात आली. या संदर्भात, मध्य प्रदेश महानगरपालिका अधिनियम-1956 च्या तरतुदीनुसार १५ डिसेंबरपासून सर्व शहरी संस्थांमध्ये विशेष मोहीम सुरू झाली आहे.

दुसरीकडे, वर्षानुवर्षे असा समज होता की उज्जैनमध्ये कोणताही राजा रात्री राहू शकत नाही, कारण येथील राजा महाकाल आहे. ही काल्पनिक गोष्टीला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी मोडीत काढली. शनिवारी रात्री ते उज्जैनमध्ये थांबले. सीएम यादव म्हणाले, मी भगवान महाकालचा पुत्र आहे, मी येथे राहू शकतो. मोहन यादव हे उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे कुटुंब शहरातील गीता कॉलनीत राहते.

मार्च २०१७ मध्ये प्रथमच यूपीचे मुख्यमंत्री झाल्यावर योगी आदित्यनाथ यांनी गौतम बुद्ध नगर नोएडाला गेले होते. तर त्यांच्या आधीचे मुख्यमंत्री नोएडाला जाण्याची तसदी घेऊ शकले नाहीत. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडाबाबत असेही बोलले जात होते की, जेव्हा-जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री नोएडामध्ये आले, तेव्हा ते पुन्हा सत्तेत आले नाहीत. बीएसपी सुप्रीमो मायावती यांनी २०११ मध्ये नोएडाला भेट देऊन अंधश्रद्धा मोडण्याचा प्रयत्न केला होता, पण २०१२ नंतर त्या कधीही सत्तेत येऊ शकल्या नाहीत. यूपीचे मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग, कल्याण सिंह, अगदी नारायण दत्त तिवारी यांनी नोएडाला गेल्यानंतर आपली जागा गमावली होती, परंतु २०१७ मध्ये योगींनी हा समज मोडून काढला आणि २०२२ मध्ये राज्यात पुन्हा सत्तेवर आले. याप्रमाणेच डॉ. मोहन यादव यांनीही काल्पनिक गोष्ट मोडीत काढली आहे.

Web Title: cm dr mohan yadav following yogi adityanath model and the myth of ujjain also broken like noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.