कव्हा येथील तलावात दोघांचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 11:32 PM2018-06-13T23:32:59+5:302018-06-13T23:32:59+5:30

शहरालगत असलेल्या कव्हा रोडवरील तलावात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

 When both of them drowned in a lake in the lake | कव्हा येथील तलावात दोघांचा बुडून मृत्यू 

कव्हा येथील तलावात दोघांचा बुडून मृत्यू 

Next

लातूर : शहरालगत असलेल्या कव्हा रोडवरील तलावात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरानजिक असलेल्या कव्हा रोडवरील तलावात खंडोबा गल्लीत राहणारे तिघे मित्र पोहण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गेले. तिघांपैकी सोहेल जमील पठाण (१४), बळीराम बाबू लोखंडे (१८) हे तलावातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. यावेळी तलावाच्या काठावर थांबलेल्या तिसऱ्या मित्राने या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर तो घाबरून घटनास्थळावरून घरी परतला. सोहेल आणि बळीराम हे दोघे रात्री उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्या मित्राकडे चौकशी केली असता, घडलेल्या घटनेबाबत त्याने माहिती दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी लातूर ग्रामीण पोलीस व गावकºयांनी या दोघांचे मृतदेह तलावाबाहेर काढले. याबाबत मोहसीन कासीमखान पठाण (२७, रा. खंडोबा गल्ली, लातूर) यांच्या माहितीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.के. निलंगेकर हे करीत आहेत.

Web Title:  When both of them drowned in a lake in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.