Shocking In Latur, the rape victim's daughter removed from school for dignity | धक्कादायक! लातूरमध्ये प्रतिष्ठेसाठी बलात्कार पीडित मुलीला काढले शाळेतून

लातूर - प्रतिष्ठेचं कारण देत लातूरमध्ये एका 15 वर्षीय बलात्कार पीडितेला शाळेतून काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आम्हाला आमच्या शाळेची प्रतिष्ठा जपायची आहे असे कारण गेत शाळा प्रशासनानं हा निर्णय घेतला. सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीनं लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. एएनआयनं याबद्दलचे वृत्त दिलं आहे.  

तू आमच्या शाळेत शिकलीस तर इतर विद्यार्थ्यांवर आणि शाळेच्या वातावरणावर त्याचा चांगला परिणाम होणार नाही असे शाळेने म्हटल्याचा आरोप या मुलीने केला आहे. माझ्या शाळेने माझा प्रवेश रद्द केला आहे. यासाठी शाळेने त्यांच्या प्रतिष्ठेचे कारण दिले असेही ती म्हणाली. 

दरम्यान बलात्कार पीडित मुलीच्या काकांनी पोलिसांवरही आरोप केले आहेत. पोलिसांनी बलात्कार प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यासाठी 50 हजार रूपयांची लाच मागितली असा आरोप त्यांनी केला. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेने तिच्या पालकांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. ज्यानंतर या पीडितेची तक्रार दाखल करण्यात आली आणि गुन्हा दाखल झाला अशीही माहिती समोर आली आहे. या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.