आईवडिल,अपंग बहिणीला मोठ्या भावाने छळले; संतापलेल्या लहान्याने त्याला गोळी झाडून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 08:02 PM2023-02-11T20:02:36+5:302023-02-11T20:24:44+5:30

कुटुंबीयांना छळणाऱ्या सूरजवर सख्ख्या भावानेच झाडली गाेळी!

Parents, disabled sister tortured by elder brother; Enraged, the little one shot him dead in Latur | आईवडिल,अपंग बहिणीला मोठ्या भावाने छळले; संतापलेल्या लहान्याने त्याला गोळी झाडून संपवले

आईवडिल,अपंग बहिणीला मोठ्या भावाने छळले; संतापलेल्या लहान्याने त्याला गोळी झाडून संपवले

googlenewsNext

लातूर : एका तरुणाची डाेक्यात गाेळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी भातखेडा (ता. लातूर) येथे समाेर आली. दरम्यान, या हत्येचा लातूर ग्रामीण पाेलिसांनी उलगडा केला. कुटुंबीयांना सतत छळणाऱ्या सूरजवर सख्ख्या भावानेच गाेळी झाडली असून, पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. लातूरच्या न्यायालयात त्याला हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

पाेलिसांनी सांगितले, दारूच्या आहारी गेलेला माेठा भाऊ आणि घरात आजारी वडील, आई, अपंग बहिणीला मानसिक-शारीरिक त्रास देत असल्याने वैतागलेल्या लहान भावानेच माेठ्या भावाच्या डाेक्यात गाेळी झाडून त्याची हत्या केली. याप्रकरणी मयत तरुणाच्या लहान भावाला पाेलिसांनी अटक केली. गाेविंद रामकृष्ण मुळे (वय ५१) हे भातखेडा वास्तव्याला आहे. त्यांना पत्नी, अपंग मुलगी, माेठा मुलगा सूरज आणि लहान मुलगा धीरज असा परिवार आहे. सूरज हा मजुरी करत असे. शिवाय, ताे दारूच्या आहारी गेला हाेता. सतत दारू पिऊन घरातील बहीण, आई, भावाला छळत हाेता. या छळाला कंटाळून लहान भाऊ धीरज हा आई आणि बहिणीला साेबत घेऊन पुण्याला राेजगारासाठी गेला. परिणामी, भातखेडा येथे गाेविंद मुळे आणि मुलगा सूरज हे दाेघेच राहत हाेते.

शवविच्छेदन अहवालातून गाेळी झाल्याचे झाले उघड...
साेमवारी रात्री घरात वडील आणि मुलगा झाेपल्यानंतर रात्री १०.३० ते सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याच्या डाेक्यात गाेळी झाडून हत्या केल्याची घटना समाेर आली. याबाबत गाेविंद मुळे यांच्या तक्रारीवरून प्रारंभी आकस्मात मृत्यूची नाेंद केली हाेती. मात्र, शवविच्छेदन अहवालात सूरज याच्या डाेक्यात बंदुकीची गाेळी आढळून आली. त्यानंतर अज्ञाताविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

पाेलिसी खाक्या दाखवताच भावाने दिली गुन्ह्याची कबुली...
प्रारंभी पाेलिसांनी दाेघांवर संशय व्यक्त केला हाेता. यातील लहान भाऊ धीरजला ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चाैकशी केली. पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गाेळी झाडल्याची कबुली दिली. लातूरच्या न्यायालयात त्याला हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. तपास पाे.नि. दीपककुमार वाघमारे करत आहेत.

पुण्यातून राताेरात आला आणि भावाचा गेम केला?
सुरजच्या छळाला कंटाळलेल्या लहान भावाने त्याची हत्या करण्यासाठी पुण्यात पिस्तूल खरेदी केली. साेमवारी रात्री ताे भातखेडा गावात आला आणि झाेपेत असलेल्या सूरजचा गेम केला. त्यानंतर ताे राताेरात पुण्यात पाेहचला, अशी माहिती पाेलिसांच्या चाैकशीत समाेर आली आहे. तर त्याने काेणाकडून पिस्तूल खरेदी केले, याचाही तपास पाेलिस करत आहेत.

Web Title: Parents, disabled sister tortured by elder brother; Enraged, the little one shot him dead in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.