काँग्रेस पक्ष कोणीही संपवू शकत नाही! काँग्रेस नेत्यांनी विश्वास व्यक्त केला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 05:27 AM2024-02-19T05:27:30+5:302024-02-19T05:31:21+5:30

विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी प्रमुख

No one can finish the Congress party Congress leaders expressed confidence | काँग्रेस पक्ष कोणीही संपवू शकत नाही! काँग्रेस नेत्यांनी विश्वास व्यक्त केला

काँग्रेस पक्ष कोणीही संपवू शकत नाही! काँग्रेस नेत्यांनी विश्वास व्यक्त केला

लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून प्रेरणा घेत काँग्रेस पक्ष एकसंध आहे. पक्षात कोणतेही गट-तट नाहीत. सर्वसामान्यांचा विश्वास असलेली काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. काँग्रेस पक्षाला कोणीही संपवू शकत नाही, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.

लातूरनजीकच्या निवळी येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण झाले. त्यावेळी प्रमुख नेत्यांनी पक्ष पुन्हा सत्तेत आणण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते, देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.

रितेश म्हणाले... काका, तुमच्यावर खूप प्रेम करतो !

लातूर : काका-पुतण्याचे नाते कसे असावे याचे उत्तम उदाहरण मंचावर आहे, असे सांगत अभिनेता रितेश देशमुख यांनी आपले काका दिलीपराव यांच्याकडे पाहत मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, अशी भावनिक साद घातली. विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी बंधू अमित देशमुख यांनी रितेशच्या पाठीवर हात ठेवत त्यांना सावरले.

अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम...

अभिनेता रितेश देशमुख यांनी भाषणात बंधू अमित यांना तुमच्याकडून लातूर व महाराष्ट्राला खूप अपेक्षा असल्याचे म्हटले. हा मुद्दा घेऊन अमित देशमुख म्हणाले, मी जिथे आहे, तिथे ठीक आहे. नाळ तोडून इकडे-तिकडे जाणे पटत नाही.

पुन्हा एकदा यशवंतरावांपासून विलासरावांपर्यंतचे दिवस आणायचे आहेत, असे सांगितल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सभेत अनेकांनी अमित यांच्या संदर्भाने नेतृत्वाची चर्चा केली.

लातूरला काका-पुतण्याचे नाते धार्जीण

राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, काका-पुतण्याचे नाते लातूरला धार्जीण आहे. राजकारणामुळे नाते तुटायला नको. लातुरात त्या बाबतीत मात्र एकोपा दिसतो. नात्यात मधुरता आहे, असेही सूचक विधान केले.

Web Title: No one can finish the Congress party Congress leaders expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.