दहावीच्या पुरवणी परीक्षेत लातूर बोर्डाचा २८.५० टक्के निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 09:18 PM2018-08-29T21:18:46+5:302018-08-29T21:19:17+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा लातूर बोर्डाचा निकाल २८.५० टक्के लागला आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत ९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

Latur Board results in the Class X supplementary examination of 28.50 percent | दहावीच्या पुरवणी परीक्षेत लातूर बोर्डाचा २८.५० टक्के निकाल 

दहावीच्या पुरवणी परीक्षेत लातूर बोर्डाचा २८.५० टक्के निकाल 

Next

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा लातूर बोर्डाचा निकाल २८.५० टक्के लागला आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत ९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी २ हजार ७५९ उत्तीर्ण झाले आहेत. 
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून ९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. नांदेड जिल्ह्यात ५ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १ हजार ६३६ उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्राविण्यात १, प्रथम श्रेणीत ५, द्वितीय श्रेणीत १७, तर उत्तीर्ण १ हजार ६१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्याचा निकाल ३०.१८ टक्के लागला आहे. 
उस्मानाबाद जिल्ह्यात २ हजार १२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्राविण्यात १, प्रथम श्रेणीत २, द्वितीय श्रेणीत ९ तर ४५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याची टक्केवारी २१.८८ अशी आहे. तर लातूर जिल्ह्यातून २ हजार १३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ६५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात प्रथम श्रेणीत १, द्वितीय श्रेणीत ५ तर ६५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याचा निकाल ३०.८३ टक्के लागला आहे. 
या परीक्षेत ६ हजार ८१९ मुले तर २ हजार ८६१ मुलींनी परीक्षा दिली होती. पैकी १ हजार ८३२ मुले तर ९२७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेत मुलांची २६.८७, तर मुलींची टक्केवारी ३२.४० आहे. याही परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच सरस आहेत.

Web Title: Latur Board results in the Class X supplementary examination of 28.50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.