बक्षी समिती अहवालात अन्याय; जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने

By हरी मोकाशे | Published: February 17, 2023 05:30 PM2023-02-17T17:30:54+5:302023-02-17T17:31:58+5:30

बक्षी समिती खंड दोननुसार समान पदांना समान वेतन श्रेणी लागू न करता अन्याय करण्यात आल्याचा आरोप

Injustice in Bakshi Committee Report; Zilla Parishad Clerk class employees staged demonstrations | बक्षी समिती अहवालात अन्याय; जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने

बक्षी समिती अहवालात अन्याय; जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने

Next

लातूर : बक्षी समिती खंड दोन अहवालात जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे, असे म्हणत जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी निदर्शने करुन संताप व्यक्त केला.

लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्रुटी होत्या. काही विशिष्ट व निवडक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करण्यात आले आहे. परंतु, बक्षी समिती खंड दोननुसार अशा समान पदांना समान वेतन श्रेणी लागू न करता अन्याय करण्यात आला आहे. एक पद एक वेतनश्रेणी मिळाली पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष संतोष माने, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लिंबराज धुमाळ, प्रशासन अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद स्वामी, लेखा कर्मचारी संघटनेचे मनोज येरोळे, रामकृष्ण फड, डी.एन. बरुरे, बालाजी चवणहिप्परगे, डी.आर. राठोड, हिरालाल शेख, मनीषा चामे, विद्या गवळी, मनोज पांचाळ, सत्तार शेख, शिवाजी बेशकराव, गोविंद मुळे, उदय बेलूरकर, बाळासाहेब कुसभागे, विश्वनाथ कोळनूरकर आदी उपस्थित होते.
 

Web Title: Injustice in Bakshi Committee Report; Zilla Parishad Clerk class employees staged demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.