केंद्र सरकारने काश्मिरी जनतेशी संवाद साधावा - सुशीलकुमार शिंदे

By admin | Published: May 11, 2017 02:45 AM2017-05-11T02:45:50+5:302017-05-11T02:50:20+5:30

सध्या काश्मीरमध्ये सुरू असलेली अशांतता संपुष्टात आणायची असेल तर केंद्र सरकारने काश्मिरातील जनतेशी थेट संवाद साधून

Center should interact with Kashmiri people - Sushilkumar Shinde | केंद्र सरकारने काश्मिरी जनतेशी संवाद साधावा - सुशीलकुमार शिंदे

केंद्र सरकारने काश्मिरी जनतेशी संवाद साधावा - सुशीलकुमार शिंदे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : सध्या काश्मीरमध्ये सुरू असलेली अशांतता संपुष्टात आणायची असेल तर केंद्र सरकारने काश्मिरातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी रामेश्वर (रूई) येथे केले.
तथागत गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्वशांती भवन उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर अयोध्या येथील राम जन्मभूमी न्यासचे डॉ. रामविलास वेदांती, जम्मू-काश्मीर विधान परिषदेचे उपसभापती जहाँगीर हुसेन मीर, सांची विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. यज्ञेश्वर एस. शास्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले, काश्मिरातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे.

Web Title: Center should interact with Kashmiri people - Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.