मुख्यमंत्र्यांना तुमचे आमदार अंधारात का भेटतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:37 AM2019-07-20T04:37:00+5:302019-07-20T04:37:07+5:30

जर तुमची पक्षावर पकड आहे, तर तुमच्या पक्षाचे आमदार रात्री अंधारात मुख्यमंत्र्यांना का भेटतात, असा सवाल भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला विचारला.

Why do the chief ministers meet in the dark? | मुख्यमंत्र्यांना तुमचे आमदार अंधारात का भेटतात?

मुख्यमंत्र्यांना तुमचे आमदार अंधारात का भेटतात?

googlenewsNext

कोल्हापूर : जर तुमची पक्षावर पकड आहे, तर तुमच्या पक्षाचे आमदार रात्री अंधारात मुख्यमंत्र्यांना का भेटतात, असा सवाल भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला विचारला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेल्या पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. तुमची ताकद वाढली तर तुम्ही आमच्या पक्षातील लोकांना का घेता, अशी विचारणा काँग्रेस-राष्टÑवादीचे नेते करत आहेत.
यावर पाटील म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही आमदाराच्या घरी आमच्या पक्षात या म्हणून निमंत्रण घेऊन गेलेलो नाही. मात्र ज्यांना त्यांच्या भवितव्याची चिंता आहे, ते रात्री अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटतात. पक्षावर पकड आहे तर असे भेटणाऱ्यांना थांबवून दाखवा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, ‘अपनी संस्कृती बढानी है इसलिए तुम्हे प्रदेशाध्यक्ष बनाया है।’ असे पाटील म्हणाले. ‘संस्कृती म्हणजे मंदिर, देव, धर्म नव्हे, तर वागण्याचा व्यवहार. कार्यकर्ते नीट व्हावेत. सहृदय वाढावा, असे पाटील यांनी सांगितले.
>मी टोपी टाकली ती विश्वजितला बसली
मी टोपी टाकायचे काम केले. ती ज्यांना बसली त्यांनीच खुलासा केला, असा टोला यावेळी पाटील यांनी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना लगावला. मी कधीही कदम, मुश्रीफ भाजपमध्ये येणार असे म्हटले नाही; मात्र मी बोलल्यानंतर लगेचच काहींनी खुलासे केले. त्यांची ही द्विधा मन:स्थिती आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Why do the chief ministers meet in the dark?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.