चिकोत्रा खोऱ्यात गव्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:09 AM2018-11-20T00:09:20+5:302018-11-20T00:09:25+5:30

पांगिरे : चिकोत्रा खोºयातील रब्बी हंगाम पेरण्या सुरू असतानाच अरण्यक्षेत्राजवळील शेतात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. अरण्य हद्दीजवळून वनविभागामार्फत खोदाई ...

Wheat panic in Chikotra Valley | चिकोत्रा खोऱ्यात गव्यांची दहशत

चिकोत्रा खोऱ्यात गव्यांची दहशत

Next

पांगिरे : चिकोत्रा खोºयातील रब्बी हंगाम पेरण्या सुरू असतानाच अरण्यक्षेत्राजवळील शेतात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. अरण्य हद्दीजवळून वनविभागामार्फत खोदाई करण्यात आलेल्या हत्ती प्रतिबंधक चरीही पूर्ण बुुजल्या असल्याने गवे थेट शिवारात वावरू लागले आहेत. अरण्यक्षेत्राजवळील अनेक शेतपिके गव्यांनी उद्ध्वस्त केली आहेत.
परिसरातील मानवळे, तोंदलेवाडी, केळेवाडी, मुरुक्टे, गोतेवाडी, भांडेबांबर, बारवे, दिंडेवाडी, बेगवडे, बेडीव, आदी गावांमध्ये गव्यांचा मोठा उपद्रव सुरू आहे. शिवारात सध्या वरणा, तूर, शाळू पिके फुलोºयात आली असून, रानगवे नुकसान करू लागल्यामुळे शेतकºयांना रात्री शेताची राखण करावी लागत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने १२ वर्षांपूर्वी मुरुक्टे, मानवळे, गोतेवाडी गावांजवळील वनहद्दीजवळून खोल हत्ती प्रतिबंधक चरींची खोदाई केली होती. यामुळे या परिसरात रानगवे फारसे येत नव्हते. गेली १२ वर्षे सतत पावसाने चरींची धूप होऊन खोली कमी झाली. गाळाने भरत गेलेल्या चरी अखेर पूर्ण भरून गेल्या. परिणामी, या अरण्यक्षेत्राजवळील गाव शिवारात रानगव्यांचा वावर वाढला आहे.
पाणी उपलब्ध असूनही काही शेतकºयांनी गेली चार वर्षे ऊसपीक गव्यांच्या उपद्रव्यास कंटाळून बंद केले आहे. या परिसरातील गावांमध्ये वरणा पिकाचे क्षेत्र जास्त होते. मात्र, रानगव्यांचे वरणा हे पीक चारा म्हणून आवडते पीक असल्यामुळे या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. परिणामी, शेतकºयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
रात्री शेतावर मुक्कामी थांबणे शेतकºयांना धोकादायक वाटू लागले आहे. पाच वर्षांपूर्वी केळेवाडी (ता. भुदरगड) येथील शेतात
मशागत कामात मग्न असलेले
निवृत्त शिक्षक बापू सखाराम शिऊडकर यांचा गव्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. आजही
अनेक शेतकरी आपला जीव धोक्यात घालून रात्री शेतपिकाची राखण करतात. वनविभागामार्फत
नुकसान झालेल्या पीक क्षेत्राची पाहणी करून जी भरपाई दिली जाते ती अत्यल्प असल्याचे शेतकºयांनी सांगितले. अरण्यक्षेत्राभोवती पुन्हा नव्याने चरींची खोदाई होणे आवश्यक आहे. अरण्यक्षेत्राजवळील हद्दीवर सोलर कुंपन, खोल चर खोदाई, नुकसान झालेल्या पिकांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अरण्यक्षेत्राजवळील शेतकरी शासनाकडे करीत आहेत.

Web Title: Wheat panic in Chikotra Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.