बावड्यात बंदी घालण्याचा ह्यांना कोणता अधिकार? महादेवराव महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:49 AM2018-09-15T00:49:19+5:302018-09-15T00:52:10+5:30

What is the right to ban in the country? Mahadevrao Mahadik | बावड्यात बंदी घालण्याचा ह्यांना कोणता अधिकार? महादेवराव महाडिक

बावड्यात बंदी घालण्याचा ह्यांना कोणता अधिकार? महादेवराव महाडिक

googlenewsNext
ठळक मुद्देशिराळ्यातून सम्राट महाडिक रिंगणातसम्राट हे महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेतमाझ्या तळहातावर विचित्र रेषा

कोल्हापूर : ‘ज्या जिल्ह्याच्या राजकारणात गेली पंचवीस वर्षे सत्तेची पदे वाटली, त्या जिल्ह्यातील कसबा बावड्यात मला बंदी घालण्याचा ह्यांना कोणी अधिकार दिला?’ असा सवाल करीत कार्यकर्त्यांना पाठवून लढण्यापेक्षा स्वत: समोर येऊ लढा, असा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी रात्री येथे बोलताना दिला. लोकसभेचा बिगुल वाजायला लागलाय. लोकसभेचा हा अश्वमेध मी धनंजयच्या हाती देतोय. जर हिंमत असेल तर या अश्वमेधाचा लगाम धरून दाखवा, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

कोल्हापुरातील शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी महागणपतीच्या मूर्तीचे अनावरण महाडिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रीतिरिवाजाप्रमाणे या कार्यक्रमात अनेक वक्त्यांची भाषणे होतात. मात्र, शुक्रवारी महादेवराव महाडिक यांनी व्यासपीठावर येताच थेट माईकचा ताबा घेतला आणि भाषणाला सुरुवात केली. त्यांचा सगळा रोष आमदार सतेज पाटील यांच्यावर होता; परंतु त्यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले.

सांगलीहून कोल्हापुरात २५ वर्षांपूर्वी आलो तेव्हापासून महाडिक परिवाराला येथील जनतेने मोठे केले. त्याच्या परतफेडीसाठी अनेकांना सत्तेची पदे दिली. त्याच जिल्ह्यातील कसबा बावड्यात मला बंदी घातल्याचे समजले. ज्यांनी बंदी घालायला सांगितले, त्यांनाच विचारणा करण्यासाठी मी सकाळी थेट त्यांच्याच (सतेज पाटील) दारात गेलो. कार्यकर्त्यांना घेऊन लढू नका; थेट माझ्याशीच लढा, असे सांगायचं होतं; पण त्यांची भेट झाली नाही. नंतर विश्वास नेजदार यांच्या घरी गेलो. तुम्हाला कोणी पत्रक काढायला लावले, याची विचारणा केली. त्या ठिकाणी ‘गोकुळ’च्या सभेचा विषय निघाला. राजकारणाला एक चांगली दिशा मिळेल, या हेतूने मी दिलगिरी व्यक्त करण्यास तेथे गेलो. त्यामध्ये कोणताही हेतू नव्हता, असे महाडिक म्हणाले.कसबा बावड्यातील नव्वद टक्के लोक माझ्यावर प्रेम करणारे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत पन्नास टक्के मतदान आपण घेऊन दाखविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


माझ्या तळहातावर विचित्र रेषा
महाडिकांच्या तळहातावर विचित्र रेषा आहेत. काही रेषा दक्षिण-उत्तर दिसतात; तर काही पूर्व-पश्चिम दिसतात. त्या रेषा माझ्या मुठीत आहेत. दुसºया कुणाच्या आवाक्यात नाहीत. महाडिक वेगळे रसायन आहे. कोणाला सोसणारं नाही. आम्ही जाणीवपूर्वक कोणाला त्रास देत नाही. म्हणूनच आमचं रसायन आणि रेषा शोधण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

झोपलेल्या वाघावर गोळ्या झाडत नाही
महाडिकांना वाघ उठवून त्याची शिकार करण्याची सवय आहे. झोपलेल्या वाघावर कधी गोळ्या झाडलेल्या नाहीत. दक्षिणेकडील युद्धाचे परिणाम चांगलेच पाहायला मिळतील. त्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही, असे महाडिक यांनी सांगितले. मी भाजपला पाठिंबा दिला, जिल्ह्यात मोठं केलं, हे सत्य आहे. गणपतीनेच तशी बुद्धी दिली.

शिराळ्यातून सम्राट महाडिक रिंगणात
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिराळा (जि. सांगली) मतदारसंघातून सम्राट महाडिक हे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात केली. शिवाजी चौकातील महागणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना बोलविले असल्याचेही महाडिक यांनी यावेळी सांगितले.

सम्राट हे महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत
सम्राट हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर असतानाच महाडिक यांनी भाजपच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात लढणाºया उमेदवारीची घोषणा करून खळबळ उडवून दिली. या मतदारसंघाचे सध्या भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक हे प्रतिनिधित्व करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघातून मानसिंगराव नाईक हे उमेदवार असतील. काँग्रेसकडून सत्यजित देशमुख यांचे नाव चर्चेत आहे.

Web Title: What is the right to ban in the country? Mahadevrao Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.