वृद्धेच्या पर्समधील गंठण लंपास, कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 04:54 PM2018-12-05T16:54:20+5:302018-12-05T16:56:27+5:30

सांगली ते मार्लेश्वर एस. टी. बसमधून प्रवास करीत असताना चोरट्याने वृद्धेच्या पर्समधील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हातोहात लंपास केले. या प्रकरणी गीता मुरलीधर महाडिक (वय ६५, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ४) फिर्याद दिली.

The type of lumberjack in the old man's lap, Kolhapur central bus station | वृद्धेच्या पर्समधील गंठण लंपास, कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथील प्रकार

वृद्धेच्या पर्समधील गंठण लंपास, कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथील प्रकार

Next
ठळक मुद्देवृद्धेच्या पर्समधील गंठण लंपासकोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथील प्रकार

कोल्हापूर : सांगली ते मार्लेश्वर एस. टी. बसमधून प्रवास करीत असताना चोरट्याने वृद्धेच्या पर्समधील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हातोहात लंपास केले. या प्रकरणी गीता मुरलीधर महाडिक (वय ६५, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ४) फिर्याद दिली.

गीता महाडिक या १९ नोव्हेंबरला देवरुख (जि. रत्नागिरी) मधील बहिणीच्या मुलीचे निधन झाल्याने त्या सांगली-मार्लेश्वर एस. टी. बसने निघाल्या होत्या. मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशांची खूप गर्दी होती. त्यांनी गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण बॅगेतील पर्समध्ये ठेवले होते.

एस. टी. बसमधून काही अंतर प्रवास केल्यानंतर गळ्यात गंठण घालण्यासाठी त्या बॅग उघडण्यास गेल्या असता अगोदरच बॅगेची चेन उघडी होती. त्यातील पर्समधील गंठण लंपास असल्याचे दिसले.

बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्याने गंठण चोरल्याची शंका त्यांना आली. देवरुखवरून परत कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
 

 

Web Title: The type of lumberjack in the old man's lap, Kolhapur central bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.