आंब्याजवळ अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:01 AM2018-01-22T01:01:52+5:302018-01-22T01:02:03+5:30

Two killed in an accident near the mango | आंब्याजवळ अपघातात दोघे ठार

आंब्याजवळ अपघातात दोघे ठार

Next


आंबा : विशाळगडला देवदर्शनास जात असताना आंब्याजवळील केर्ले गावच्या अपघाती वळणावर मोटारसायकल व डंपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. बबलू जेम्स डेव्हीड (वय २८, रा. जयसिंगपूर, २री गल्ली) व संग्राम अर्जुन चव्हाण (२५, रा. कोंडिग्रे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सायंकाळी पावणेसहा वाजता हा अपघात झाला. अपघाताची शाहूवाडी पोलिसांत नोंद झाली. १०८ सेवा गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली, पण मृतदेह नेण्याची परवानगी नसल्याने मृतदेह रस्त्यावर पडून होते. पोलीस साडेसातला घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : बबलू डेव्हीड हा लक्ष्मी क्रेन कंपनीत चालक म्हणून नोकरीस होता. त्याच्यासोबत संग्राम कामास होता. रविवारची सुट्टी असल्याने डेव्हीड अन्य चार मित्रांसह तीन मोटारसायकली घेऊन बारा वाजता जयसिंगपूरहून विशाळगडकडे निघाले. वाटेत जेवण करून मलकापूरमध्ये डेव्हीडने आपली गाडी महेश हिरेमठ या मित्राला दिली. त्याची पल्सर (एम एच ०९ डी व्ही ८३६९) स्वत: घेऊन ते विशाळगडकडे पुढे निघाले. वाटेत केर्ले गावाच्या अपघाती वळणावर समोरून आलेल्या डंपरवर (एम एच १० ए डब्लू ७८३०) धडकले. ही धडक एवढी जोरदार होती की मोटारसायकलच्या हेडलाईटचे कव्हर डंपरच्या बंपरमध्ये घुसले. डंपरने मोटारसायकलला सुमारे तीस फूट पुढे फरफटत नेले. यामध्ये मोटारसायकलचा पुढील भाग निकामी झाला. दोघांच्या डोक्याला मार बसून मोठा रक्तस्राव झाला. डेव्हीडचे मित्र मागोमाग येत होते. वाटेत मित्रांचे मृतदेह बघून चारही मित्रांची बोबडीच वळली. काय करायचे त्यांना सुचेना. स्थानिकांनी त्यांना धीर देऊन घरी कळवण्याचे सुचवले. मृत दोघेही अविवाहित असून, डेव्हीडला दोन भाऊ, आई-वडील आहेत. सोबत डेव्हीडचे चार मित्र होते, पण संग्रामची त्यांना ओळख नव्हती. त्यामुळे अपघातानंतर दोन तास त्याचा पूर्ण पत्ता समजेना. पोलीस आल्यानंतर खिशातील आधारकार्डवरून त्याची ओळख पटली. त्यानंतर त्यांच्या घरी कळवण्यात आले. डंपरचालक डंपर सोडून पसार झाला होता. मृतदेह नेणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने डंपरमध्येच मृतदेह टाकून पोलिसांनी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेले.

अपघाती वळणावर फलकांची गरज
गणेश जयंतीनिमित्त मानोली, मलकापूर व कोकण भागात महामार्गावर मोठी वर्दळ होती.
वळणावरच डंपर व मृतदेह पडल्याने वाहनांना कसरत करून पुढे जावे लागत होते. बघ्यांची गर्दी, त्यात धोक्याचे
वळण पाहून येथील अपघात मदत पथकाचे कार्यकर्ते प्रमोद माळी, कृष्णा दळवी, गणेश पाटील, बापू
जाधव व पोलीसपाटील यांनी मार्गावर थांबून पोलिसांच्या गैरहजेरीत वाहतूक नियंत्रित करून वाहकांना मदत केली. केर्ले येथील पुलावरील हे
वळण अपघाताचे केंद्र बनले आहे. येथे पांढरे पट्टे
व सूचना फलकाची गरज आहे.

Web Title: Two killed in an accident near the mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.