दूध उत्पादकांच्या जीवनात ‘आनंद’ फुलविणारा ‘गोकुळ’, हिरकमहोत्सवी वर्षाची आज सांगता 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 01:44 PM2024-03-16T13:44:51+5:302024-03-16T13:45:03+5:30

कोल्हापूर : ‘ गोकुळ’ दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक ...

Today marks the diamond jubilee year of Gokul Milk Union kolhapur | दूध उत्पादकांच्या जीवनात ‘आनंद’ फुलविणारा ‘गोकुळ’, हिरकमहोत्सवी वर्षाची आज सांगता 

दूध उत्पादकांच्या जीवनात ‘आनंद’ फुलविणारा ‘गोकुळ’, हिरकमहोत्सवी वर्षाची आज सांगता 

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम ‘गोकुळ’ने केले आहे. हिरकमहोत्सवी वर्षाचा आज, शनिवारी दुपारी दोन वाजता अमृतसिद्धी हॉल, कळंबा येथे सांगता समारंभ असून, यावेळी दूध उत्पादकांचा गौरव करण्यात येणार आहे.

‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील - चुयेकर यांच्या अविरथ प्रयत्न आणि एन.टी. सरनाईक यांच्या मिळालेल्या साथीमुळे ‘गोकुळ’चा पाया भक्कम झाला. प्रारंभी १६ मार्च, १९६३ रोजी २२ संस्था आणि ७०० लीटर दूध संकलनावरून संघाचा प्रवास सुरू झाला, तत्कालीन नेतृत्वाने श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचा विस्तार केला. आज, संघाची प्रतिदिनी १७ लाख लीटर दूध हाताळणी क्षमता व दूध पावडर निर्मिती आहे.

दहा दिवसाला ७० कोटी दूध बिल

दर दहा दिवसाला ७० कोटींहून अधिक दूध बिल दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणारा ‘गोकुळ’ एकमेव दूध संघ आहे. संघाची वार्षिक उलाढाल साडेतीन हजार कोटी असून, वीस लाख लीटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्याच्या ध्येयाने संचालक मंडळाचे काम सुरू आहे.

दृष्टिक्षेपात ‘गोकुळ’ दूध संघ -

  • वार्षिक उलाढाल सरासरी - ३,४२८ कोटी
  • अधिकृत भाग भांडवल - १०० कोटी
  • वसूल भाग भांडवल - ६१.६४ कोटी
  • राखीव इतर निधी - ३७०.५७ कोटी
  • गुंतवणूक - २७४.७४ कोटी
  • कायम मालमता - २६३ कोटी
  • निव्वळ नफा ९.१९ कोटी
  • अंतिम दूध दर फरक - १०४ कोटी
  • एकूण दूध संकलन - ४७ कोटी ४४ लाख लीटर
  • प्रतिदिनी सरासरी संकलन - १५ लाख लीटर
  • प्रतिदिनी सरासरी विक्री - १४ लाख लीटर


दूध उत्पादक शेतकरी हा ‘गोकुळ’चा कणा असून, ग्राहकांच्या विश्वासावर आज देशपातळीवर संघाने दबदबा निर्माण केला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा कारभार सुरू असून, एकूण उत्पन्नातील ८२ टक्के रकमेचा परतावा देण्याची परंपरा कायम राखली आहे. सर्वांच्या सहकार्यावर लवकरच २० लाख लीटर दुधाचा टप्पा यशस्वीपणे निश्चित पार करू. - अरुण डोंगळे (अध्यक्ष, ‘गोकुळ’)

Web Title: Today marks the diamond jubilee year of Gokul Milk Union kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.