तीस पोलीस अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर जिल्अंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:01 PM2018-06-08T23:01:11+5:302018-06-08T23:01:11+5:30

जिल्'त दोन वर्ष पूर्ण झालेल्या पंधरा पोलीस निरीक्षक, पंधरा सहायक निरीक्षक अशा तीस अधिकाऱ्यांच्या जिल्'अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी रात्री काढले.

Thirty police officers transfer under the district of Kolhapur | तीस पोलीस अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर जिल्अंतर्गत बदल्या

तीस पोलीस अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर जिल्अंतर्गत बदल्या

Next

कोल्हापूर : जिल्'त दोन वर्ष पूर्ण झालेल्या पंधरा पोलीस निरीक्षक, पंधरा सहायक निरीक्षक अशा तीस अधिकाऱ्यांच्या जिल्'अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी रात्री काढले. खात्यामधील अतिमहत्त्वाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकपदी लक्ष्मीपुरीचे तानाजी सावंत तर शहर वाहतूक शाखा (ट्रॅफिक) ला जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांची बदली झाली.
जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची उत्सुकता गेल्या महिन्याभरापासून लागून राहिली होती. आपल्या सोयीप्रमाणे पोलीस ठाणे मिळण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने ‘दादा’साहेबांपर्यंत फिल्डिंग लावली होती. शुक्रवारी पोलीस अधीक्षक मोहिते यांनी बदल्यांची यादी जाहीर केली. जुना राजवाडा व कागल पोलीस ठाणे येथे जिल्'बाहेरील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तोपर्यंत ही पदे रिक्त ठेवली आहेत.

पोलीस निरीक्षक (कंसात बदलीचे ठिकाण)
तानाजी सावंत-लक्ष्मीपुरी (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), औदुंबर पाटील-नियंत्रण कक्ष (राजारामपुरी), अनिल गुजर-जुना राजवाडा (शहर वाहतूक शाखा), दिलीप जाधव-करवीर (लक्ष्मीपुरी), सुनील पाटील-आजरा (करवीर), श्रीप्रसाद यादव (चंदगड), मनोहर रानमाळ-इचलकरंजी (शाहूवाडी), प्रवीण चौगुले-सायबर (शिरोळ), उदय डुबल-नियंत्रण कक्ष (भुदरगड), सीताराम डुबल-नियंत्रण कक्ष (हातकणंगले), अशोक पवार-नियंत्रण कक्ष (वडगाव), यशवंत गवारी-वडगाव (मानव संशोधन (तात्पुरता पदभार), संदीप भागवत-गगनबावडा (आजरा), श्रीकृष्ण कटकधोंड (पासपोर्ट सुरक्षा शाखा), अंबरुषी फडतरे (सायबर)

सहायक पोलीस निरीक्षक (कंसात बदलीचे ठिकाण)
शहाजी निकम-राजारामपुरी (जयसिंगपूर), संजय हारुगडे-शिवाजीनगर (शहापूर), संजीवकुमार झाडे-शहापूर (कोडोली), मंगेश देसाई-कळे (कुरुंदवाड), रवींद्र कदम-आजरा (कळे), विठ्ठल दराडे-राजवाडा (मुरगूड), तृप्ती देशमुख-शाहूपुरी (इस्पुर्ली), प्रज्ञा देशमुख-शहापूर (महिला कक्ष), बाजीराव सूर्यवंशी-शहर वाहतूक शाखा (गगनबावडा), कुमार कदम -कुरुंदवाड (आर्थिक गुन्हे शाखा), समीर गायकवाड-शिरोळ (पोलीस अधीक्षक वाचक), प्रियांका शेळके-महिला कक्ष (अ‍ेएचटीयू), भालचंद्र देशमुख (शाहूपुरी), किरण भोसले (जुना राजवाडा), स्वप्नील लोखंडे (शिवाजीनगर)
------------------------

 

Web Title: Thirty police officers transfer under the district of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.