कारखान्यातील पाच इलेक्ट्रीक मोटर्सची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:36 PM2019-03-28T14:36:26+5:302019-03-28T14:37:20+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेने सीलबंद केलेल्या कारखान्यातून सुमारे ३८ हजार रुपये किंमतीचे लेथ मशीन मोटर, घाणी मशिनची मोटर, चाळण आदी साहित्याची अज्ञातांनी चोरी केली. ही घटना जवाहरनगरमधील पोळ मेटल इंडस्ट्रीज मध्ये घडली. याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Theft of five electric motors in the factory | कारखान्यातील पाच इलेक्ट्रीक मोटर्सची चोरी

कारखान्यातील पाच इलेक्ट्रीक मोटर्सची चोरी

ठळक मुद्देकारखान्यातील पाच इलेक्ट्रीक मोटर्सची चोरीजवाहरनगरातील घटना : ३८ हजाराच्या मुद्देमालाची चोरी

कोल्हापूर : महानगरपालिकेने सीलबंद केलेल्या कारखान्यातून सुमारे ३८ हजार रुपये किंमतीचे लेथ मशीन मोटर, घाणी मशिनची मोटर, चाळण आदी साहित्याची अज्ञातांनी चोरी केली. ही घटना जवाहरनगरमधील पोळ मेटल इंडस्ट्रीज मध्ये घडली. याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रीधर खंडेराव पोळ (रा, सम्राटनगर, केदार कॉम्प्लेक्स, कोल्हापूर) यांच्या मालकीचे सुभाषनगरमध्ये पोळ मेटल इंडस्ट्रीज हा कारखाना आहे. पण महानगरपालिकेने जानेवारी २०१९ मध्ये हा कारखाना काही कारणांस्तव सीलबंद केला आहे. त्यामुळे तो बंद अवस्थेत आहे.

दरम्यान, अज्ञात चोरट्याने कारखान्याच्या भींतीवरील वॉलजाळी उचकटून काढून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील दोन लेथ मशिनच्या मोटर्स, घाणी मशिनची एक मोटर, चाळण मशिनची मोटर, ग्रायंडर मशिनची मोटर, वेल्डींग मशीन, ग्रायंडर आदी सुमारे ३८ हजार रुपयेंचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत राजारामपूरी पोलिसांत श्रीधर पोळ यांनी तक्रार दिली आहे.
 

Web Title: Theft of five electric motors in the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.