‘शॉर्ट मार्जिन’मध्ये साखर कारखाने : हसन मुश्रीफ, मूल्यांकन घसरल्याने परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:19 AM2018-04-05T01:19:07+5:302018-04-05T01:19:07+5:30

 Sugar factories in 'Short margins': Hasan Mushrif, the result of the drop in valuation | ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये साखर कारखाने : हसन मुश्रीफ, मूल्यांकन घसरल्याने परिणाम

‘शॉर्ट मार्जिन’मध्ये साखर कारखाने : हसन मुश्रीफ, मूल्यांकन घसरल्याने परिणाम

Next
ठळक मुद्देसाखर खरेदीचा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ‘शब्द’ पाळावा

कोल्हापूर : राज्य सहकारी बँकेने साखरेचे दरातील घसरण लक्षात घेऊन मूल्यांकन प्रतिपोते १८० रुपयांनी कमी केल्याने साखर कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत. साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असून केंद्राने प्रतिक्विंटल सातशे रुपये निर्यात अनुदान द्यावे. त्याचबरोबर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दहा लाख टन साखर खरेदीचा दिलेला ‘शब्द’ पाळावा, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
बँकेने ३१०० रुपयांवरून २९२० रुपये मूल्यांकन आणल्याने प्रतिपोते १८० रुपये कमी पडत आहेत. अगोदरच प्रतिटन २५०० रुपये देताना दमछाक उडाली असताना मूल्यांकन घटल्याचा फटका कारखान्यांना बसणार आहे. पुढील हंगामातील उसाचे उत्पादन पाहता गंभीर प्रश्न आहे. आगामी हंगामात कारखाने सुरू होण्याची भीती आहे. आता केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज असून निर्यात व वाहतूक अनुदान देऊन साखर बाहेर पाठविली पाहिजे. त्यासाठी किमान सातशे रुपये अनुदान द्यावे. कारखान्यांनी उघड्यावरच साखर ठेवली आहे, पावसाळ्यापूर्वी निर्यात होण्याची गरज आहे. केंद्राने बफरस्टॉक करून साठ्यावर बँकांना व्याज द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, पी. जी. शिंदे, संजय मंडलिक, भैया माने, बाबासाहेब पाटील, विलास गाताडे, संतोष पाटील, आर. के. पोवार, उदयानी साळुंखे, आसिफ फरास, आदी उपस्थित होते.

Web Title:  Sugar factories in 'Short margins': Hasan Mushrif, the result of the drop in valuation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.