हत्तीना माघारी धाडण्यासाठी उपाययोजनासंबधी अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 06:49 PM2017-09-28T18:49:51+5:302017-09-28T18:54:08+5:30

पन्हाळा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कोलीक-पडसाळी परिसरात फिरत असलेल्या हत्तीसह जिल्ह्यातील जंगलामध्ये असलेल्या ४ हत्तीना हुसकावण्यासंबधी उपाययोजना करण्यासाठी राज्याच्या वनविभागाच्या मुख्य कार्यालयास अहवाल सादर केला आहे. अशी माहीती उपवनसंरक्षक डॉ. प्रभु नाथ शुक्ला यांनी गुरुवारी दिली.

Submit report on remedial measures for returning elephants | हत्तीना माघारी धाडण्यासाठी उपाययोजनासंबधी अहवाल सादर

हत्तीना माघारी धाडण्यासाठी उपाययोजनासंबधी अहवाल सादर

googlenewsNext
ठळक मुद्देउपवनसंरक्षक प्रभु नाथ शुक्ल यांनी दिली माहीती चंदगड, आजरा, राधानगरी, गगनबावडा परिसरात चार हत्ती आजरा (घाटकरवाडी) येथे हत्ती पार्कचे नियोजनप्रशिक्षित माहुत व कर्मचारी वर्गही तैनात केला जाणार

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कोलीक-पडसाळी परिसरात फिरत असलेल्या हत्तीसह जिल्ह्यातील जंगलामध्ये असलेल्या ४ हत्तीना हुसकावण्यासंबधी उपाययोजना करण्यासाठी राज्याच्या वनविभागाच्या मुख्य कार्यालयास अहवाल सादर केला आहे. अशी माहीती उपवनसंरक्षक डॉ. प्रभु नाथ शुक्ला यांनी गुरुवारी दिली.


कोल्हापूर - सिधुदुर्ग या परिसरातील जंगलामध्ये गेल्या वर्षभरात कर्नाटकातून आलेले २ टस्कर, एक मादी हत्तीण व एक नर हत्ती असे चार हत्ती चंदगड, आजरा, राधानगरी, गगनबावडा या परिसरातील जंगलामध्ये आहेत.

या हत्तींचा त्रास शेतकºयांना होऊ नये म्हणून पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर सौर कुंपन व चर खणण्याची उपाययोजना केली जाणार आहे. यासह ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने या हत्तींवर नजर ठेवली जाणार आहे. परिसरातील हत्तींना हुसकावण्यासाठी ठोस उपाय योजना केली जाणार आहे. यासंबधी नागपूर येथील मुख्य कार्यालयास अहवाल सादर करण्यात आला आहे. विशेषत: कर्नाटकात हत्तींची संख्या ६ हजार इतकी आहे. त्यातील सिंधुदुर्ग व कोल्हापूर या वनक्षेत्रात एकूण ८ हत्ती वर्षभरात स्थलांतरीत झाले होते. त्यापैकी दोन टस्कर, एक मादी व एक नर असे चार हत्तींचा अजूनही येथे वावर आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ताब्यात न आल्यास हुसकावून लावले जाण्यासबंधी उपाययोजना केल्या जातील. कर्नाटकातील म्हैसुर-कौडगु येथील नागरहोळ राष्ट्रीय उद्यानात कोल्हापूर वनविभागातून हत्ती पाठविण्यात आला होता. तो त्यांनी परत पाठविल्याची माहीतीही शुक्ला यांनी दिली.

आजरा (घाटकरवाडी) येथे हत्तींसाठी पार्क

आजरा येथील घाटकरवाडीमध्ये हत्तींसाठी विर्स्तीण जागेत हा पार्क उभा करण्यात येणार आहे. या ठिकाणी हत्तीच्या चाºयाची मुबलक सोय करण्यात येणार आहे. या पार्कजवळ मुबलक पाणीसाठा असलेले धरण आहे. त्यामुळे पाण्याची मुबलक सोय आहे. या पार्कमध्ये दिवसभर हत्तीला बंदीस्त करण्यात येणार आहे. रात्री या हत्तींना जंगलात मोकळे सोडले जाणार आहे.

या पार्ककरीता प्रशिक्षित माहुत व कर्मचारी वर्गही तैनात केला जाणार आहे. याकरीता कर्नाटकामध्ये असलेल्या पार्कचा अभ्यास करण्याकरीता विशेष पथकही तिकडे पाठविण्यात येणार आहे. या पार्ककरीता निधीची आवश्यकता असल्याने याचाही अहवाल नागपूर येथील मुख्य कार्यालयास सादर करण्यात आला आहे.

 

Web Title: Submit report on remedial measures for returning elephants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.